भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व फलंदाज श्रेयस हे दुखापतीमुळे सध्या मैदानापासून दूर आहेत. बुमराह मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहेत. तर श्रेयसला मागील महिन्यात संपन्न झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. दोन्ही खेळाडू भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू असल्याने त्यांच्या दुखापतीविषयी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अपडेट दिले आहे.
🚨 NEWS 🚨
Medical Update: Jasprit Bumrah and Shreyas Iyer
Details 🔽 #TeamIndiahttps://t.co/LKYAQi5SIn
— BCCI (@BCCI) April 15, 2023
भारतीय संघाच्या गोलंदाज आक्रमणाचा प्रमुख म्हणून जसप्रीत बुमराह याच्याकडे पाहिले जाते. मागील वर्षी तो आशिया चषकापासून कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेत खेळला नाही. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील दोन सामने खेळून तो जायबंदी झाला होता. त्यानंतर त्याने अद्याप मैदानात पाऊल टाकले नाही. त्याच्या याच दुखापतीबाबत माहिती देताना बीसीसीआयने लिहिले,
‘बुमराहची मागील महिन्यात न्यूझीलंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी सहा महिन्याच्या आरामानंतर त्याला पुनर्वसन सुरू करण्याचा सल्ला दिलेला. शुक्रवारपासून त्याने बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसन सुरू केले आहे.’
तर श्रेयस अय्यरच्या दुखापतीविषयी सांगितले गेले की,
‘श्रेयसच्या पाठीच्या खालच्या भागात पुढील आठवड्या शस्त्रक्रिया केली जाईल. त्यानंतर दोन आठवडे तो तज्ञांच्या निरीक्षणाखालीच असेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो एनसीएमध्ये दाखल होईल.’
श्रेयसला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटीतील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सरावा दरम्यान पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो या सामन्यातून बाहेर गेला होता. तसेच आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात देखील तो खेळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय या दोन्ही खेळाडूंना वनडे विश्वचषकासाठी संघात पाहू इच्छिते.
(BCCi Official Update On Jasprit Bumrah And Shreyas Iyer Injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी भारतीय चाहत्यांची तोंडं बंद केली…’, शतक ठोकल्यानंतर हे काय बोलला हॅरी ब्रुक
राणा-रिंकूची झुंज अपयशी! सनरायझर्सची केकेआरवर 23 धावांनी मात, ब्रुकचे दमदार शतक