दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय (sa vs ind odi series) मालिकेत ०-३ ने क्लीन स्वीप मिळाल्यानंतर भारतीय संघावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खास करून मालिकेत संघाचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुल (kl rahul) याच्यावर सर्वजण नाराज दिसत आहेत. धोनी आणि विराटच्या नेतृत्वात जी खास गोष्ट होती, ती राहुलच्या नेतृत्वात दिसली नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने राहुलला भारताच पुढच्या कर्णधार म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. तसेच माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही राहुलच्या नेतृत्वाविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली.
राहुलला कसोटी कर्णधार बनवण्याविषयी बीसीसीआय अधिकाऱ्याने विचारला उलट प्रश्न
विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर नवीन कसोटी कर्णधारासाठी केएल राहुलचे नाव चर्चेत आहे. परंतु, बीसीसीआय अधिकाऱ्याने त्याच्या नेतृत्वावर निराशा व्यक्त केली आहे. माहितीनुसार, जेव्हा अधिकाऱ्याला विचारले गेले की, राहुल कसोटी कर्णधारपदाचा दावेदार आहे का ? त्यावर या अधिकाऱ्याने उलट उत्तर दिले. अधिकारी म्हणाला की, तो कर्णधारासारखा वाटतो का ?
गावसकरदेखील राहुलच्या नेतृत्वावर असमाधानी
राहुलच्या खराब नेतृत्वानंतर चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे. भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर देखील त्याच्या नेतृत्वावर नाराज झाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले की, “जेव्हा कधी एखादी भागीदारी बनते, तेव्हा कर्णधार त्याची कल्पना घेऊन येत असतो, पण केएल राहुल मला याबाबतीत मागे पडल्यासारखा वाटला. मात्र, ही त्याची सुरुवात आहे, आशा आहे की, गोष्टी बदलतील.”
कर्णधार म्हणून आयपीएमध्येही खराब प्रदर्शन
दरम्यान, राहुलने मागच्या दोन वर्षांपूर्वी संघाचे नेतृत्व करायला सुरुवात केली आहे. आयपीएमध्ये त्याने पहिले दोन वर्ष पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व केले. परंतु त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्ज संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. आयपीएलमध्ये मागच्या दोन हंगामात पंजाब संघ प्लेऑफमध्येही जागा बनवू शकला नाही. राहुलच्या नेतृत्वात पंजाब संघाने २७ आयपीएल सामने खेळले आणि त्यातील निम्यापेक्षा कमी म्हणजेच ११ सामने संघ जिंकला आहे.
महत्वाच्या बातम्या –
अख्तर म्हणतोय,”टी२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा भारताला हरवेल”
२०२१ गाजवत आफ्रिदी बनला ‘आयसीसी प्लेअर ऑफ द इयर’
व्हिडिओ पाहा –