ऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक दौऱ्यापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. भारतीय संघात सतत बदल होत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता एका ताज्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की बोर्ड यो-यो टेस्ट परत आणण्याचा विचार करत आहे. जोपर्यंत विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. तोपर्यंत यो यो टेस्टचे महत्त्व खूप जास्त होते. मात्र, राहुल द्रविडच्या कार्यकाळात ही चाचणी काढून टाकण्यात आली. त्यावेळी बोर्डाने म्हटले होते की खेळाडूंवरील कामाचा ताण खूप जास्त आहे आणि अशा परिस्थितीत यो यो टेस्ट घेणे योग्य ठरणार नाही.
दरम्यान आता बोर्ड अॅक्शन मोडमध्ये असल्याने, पुन्हा एकदा ही टेस्ट परत घेण्याचा विचार केला जात आहे. खरंतर, या टेस्टद्वारे खेळाडूंची तंदुरुस्ती किंवा त्याच्यात कोणती शंका नाही ना हे तपासली जाते. कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघाने तंदुरुस्तीवर खूप काम केले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बोर्डाला वाटते की काही खेळाडूंना यो यो टेस्ट काढून टाकून हलके केले आहे, ज्याचा ते फायदा घेत आहेत.
🚨 UPDATE ON BCCI PLANNING BRING BACK STRICT FITNESS IN TEAM INDIA 🚨
– Planning to bring back Yo-Yo Test.
– Fitness criteria for selection in the team.
– Some players take fitness lightly.
– planning to introduce fitness criteria for India’s selection. (TOI). pic.twitter.com/MWL4DZH9Ot— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 16, 2025
यो-यो टेस्टवर बराच काळ चर्चा झाली नव्हती पण अलीकडेच माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाने या नियमाबाबत एक जुनी गोष्ट उलगडली. उथप्पाने एका मुलाखतीदरम्यान दावा केला होता की या टेस्ट मुळेच दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली. उथप्पा म्हणाला होता की, कर्करोगावर मात करून पुनरागमन करणाऱ्या युवराजने यो-यो टेस्टमध्ये दोन गुणांची सवलत मागितली होती, जी नाकारण्यात आली.
उथप्पाने असाही दावा केला होता की हे सर्व कोहलीच्या सांगण्यावरून घडले आणि कोहली यो यो टेस्टमध्ये कोणालाही कोणतीही सूट देण्याच्या बाजूने नव्हता. मात्र, 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळताना युवराजने ही टेस्ट उत्तीर्ण केली होती.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याची तिकिटे चक्क इतक्या रुपयांत, पीसीबीकडून रेट कार्ड जाहीर
ड्रेसिंग रुममधील चॅट लिक करणाऱ्या खेळाडूचे नाव समोर, हेड कोचचा गंभीर आरोप?
हा संघ आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल खेळणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी