भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याचबरोबर तो त्याच्या ट्रेंडी पोस्ट्स आणि मजेदार कमेंट्समुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अशाच प्रकारे अय्यरने शुक्रवारी (21 फेब्रुवारी) बीसीसीआयने पोस्ट केलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) फोटोवर कमेंट केली आहे
आज बेसिन रिझर्व (Basin Reserve) येथील भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand ) संघातील पहिल्या कसोटी सामन्याच्या नाणेफेकपूर्वी बीसीसीआयने (BCCI) विराटचा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने चाहत्यांनाच या फोटोला कॅप्शन द्या असे म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/B8zph6zABPG/?utm_source=ig_web_copy_link
या फोटोमध्ये विराटने भारतीय संघाचे ब्लेझर घातले आहे आणि वेलिंग्टनमध्ये नाणेफेकपूर्वी तो डान्सिंग पोझिशनमध्ये उभा आहे. बीसीसीआयने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अय्यरने या फोटोवर मजेशीर कमेंट (Funny Comment) केली आहे. या कमेंटमध्ये त्याने बॉलिवूडमधील हिंदी चित्रपटाच्या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ते असे की, “के घुंगरू टूट गये.”
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी अय्यरला भारतीय संघात घेण्यात आले नाही. अय्यरने आतापर्यंत 18 वनडे आणि 22 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.यामध्ये त्याने वनडेत 748 धावा केल्या आहेत. तर टी20त 417 धावा केल्या आहेत.
३० वर्षांनंतर अगरवाल न्यूझीलंडमध्ये असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय
वाचा👉https://t.co/zrJ5iRMjRP👈#म #मराठी #Cricket #INDvsNZ #TeamIndia @mayankcricket— Maha Sports (@Maha_Sports) February 21, 2020
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दिवशी भारताची फलंदाजी गडगडली; पण रहाणेची एकाकी झूंज
वाचा👉https://t.co/PUKjMGe6DQ👈#म #मराठी #Cricket #INDvsNZ #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 21, 2020