---Advertisement---

क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद

On: गुरूवार, मे 26, 2022 2:29 PM
Ganguly-Reaction
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल)च्या एलिमिनेटरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवूून ठेवणाऱ्या इडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात बेंगलोरने लखनऊला १४ धावांनी पराभूत करत क्वालिफायर २चे तिकिट मिळवले.

नाणेफेक जिंकून कर्णधार केएल राहूलने (KL Rahul) बेंगलोरला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी कर्णधार फाफ डु प्लेसीस पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भोपळा न फोडताच बाद झाला. तर दुसरा सलामीवीर विराट कोहलीही (Virat Kohli) लवकरच तंबूत परतला. तत्पूर्वी त्याने फलंदाजी करताना काही अप्रतिम शॉट्स मारले जे पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेले भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हे दोघेही स्वत:ला टाळ्या वाजवण्यापासून रोखू शकले नाही. तसेच त्यांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत.

फलंदाजीसाठी आलेल्या कोहलीने दुष्मंथा चामिराच्या पहिल्याच चेंडूवर मिड-विकेटवर फ्लिक शॉट मारत चौकार मिळवला. अप्रतिम कव्हर ड्राईव्हसाठी प्रसिद्ध असलेल्या कोहलीचा या सामन्यातील शॉट पाहून त्याचा मागील काही सामन्यांतील खराब फॉर्ममधून तो सावरत आहे असे दिसून येत होते.

कोहलीचा हा उत्तम फ्लिक शॉट पाहून समालोकच सुद्धा खूष दिसत होते. तेवढ्यात कॅमेरामनने गांगुली आणि शहा यांच्याकडे कॅमेरा वळवला. तर ते दोघेही या शॉटवर आनंदीत होऊन टाळ्या वाजवून होते.

या सामन्यामध्ये कोहलीने २४ चेंडूत २५ धावा केल्या. यामध्ये त्याने दोन चौकार मारले. यावेळी बेंगलोरने २० षटकात ४ गडी गमावत २०७ धावसंख्या उभारली. फाफनंतर आलेल्या रजत पाटीदारने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने हे झंझावाती शतक ठोकले. तर दिनेश कार्तिकनेही झटपट खेळी करत २३ चेंडूत नाबाद ३७ धावा जोडल्या. त्याच्य बदल्यात लखनऊने २० षटकात ६ गडी गमावत १९३ धावा केल्या.

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी बेंगलोरला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध विजय मिळवावा लागेल. हा सामना २७ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

कोहलीचा ‘विराट’ विक्रम, २५ धावांची छोटेखानी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या धाकड फलंदाजाला पछाडले

अनसोल्ड खेळाडू ते मॅच विनर, लखनऊविरुद्ध शतक ठोकणारा आरसीबीचा रजत पाटीदार; वाचा त्याच्याबद्दल

‘मी आयुष्यात अशी खेळी पाहिली नाही’, शतकवीर पाटीदारचं कर्णधाराकडून कौतुक; ‘या’ खेळाडूचीही स्तुती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---