रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली याने बरेचसे विलक्षण विक्रम आपल्या नावावर केले आहेत. बुधवारी (२५ मे) लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२च्या एलिमिनेटर सामन्यातही त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराटने २५ धावांची छोटेखानी खेळी करत टी२० क्रिकेटमधील विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
कोहलीचा विराट कारनामा
विराटने (Virat Kohli) लखनऊविरुद्ध (LSG vs RBC) फलंदाजी करताना विराटने सलामीला फलंदाजीला येत २४ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. या खेळीसह तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (Most Runs In T20) करण्याच्या विक्रमात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचला (Aaron Finch) मागे टाकले आहे. फिंच १०५८५ धावांसह सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. तर विराटने १०६०७ धावांसह पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराटपुढे अजून ४ खेळाडू आहेत. मात्र भारताकडून ही लक्षणीय कामगिरी करणारा विराट पहिलाच फलंदाज आहे. या यादीत अव्वलस्थानी ख्रिस गेल असून त्याच्या खात्यात १४५६२ धावा आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरील शोएब मलिकच्या खात्यात ११६९८ धावा आहेत. कायरन पोलार्ड (११५७१ धावा) आणि डेविड वॉर्नर (१०७४० धावा) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
विराट कोहलीची चालू हंगामातील कामगिरी
विराटला चालू हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विशेष फलंदाजी करता आली नव्हती. परंतु पुढे त्याने आपल्या प्रदर्शनात सुधारणा केल्या आहेत. विराटने या हंगामाक १५ सामने खेळताना २३.८६ च्या सरासरीने ३३४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ अर्धशतके निघाली आहेत. तो चालू हंगामात बेंगलोरकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे.
महा स्पोर्ट्सच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अनसोल्ड खेळाडू ते मॅच विनर, लखनऊविरुद्ध शतक ठोकणारा आरसीबीचा रजत पाटीदार; वाचा त्याच्याबद्दल
‘मी आयुष्यात अशी खेळी पाहिली नाही’, शतकवीर पाटीदारचं कर्णधाराकडून कौतुक; ‘या’ खेळाडूचीही स्तुती
रजत पाटीदारला कृणालच्या ‘त्या’ षटकातच आला शतक करण्याचा कॉन्फिडन्स, वाचा त्याची प्रतिक्रिया