भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामने पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यापूर्वी या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जायची. ज्यामध्ये क्रिकेट चाहत्यांना रंगतदार सामने पाहायला मिळायचे. ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या ॲशेस सिरीजपेक्षा काही कमी नसायची. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत वादांमुळे पाकिस्तान संघातील खेळाडूंना भारतात येण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.
अशातच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका खेळवण्याबाबत पाकिस्तानी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल याने आश्चर्यचकित करणारे वक्तव्य केले आहे.
भारतीय आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये २०१३ मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. त्यानंतर हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने आले आहेत. अशातच पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल याने द्विपक्षीय मालिका खेळवण्याबाबत आपले मत मांडले आहे.
त्याने म्हटले की, “भारतीय क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची भूमिका याबाबतीत महत्वाची असणार आहे. कारण त्यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध भरपूर सामने खेळले आहेत. ते भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील सामन्यांचे महत्व समजतात. या सामन्यांमुळे दोन्ही देशातील नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. मला असे वाटते की, त्यांनाही भारत-पाकिस्तान संघाला एकत्र खेळताना पाहायचं आहे. मी त्यांच्यासोबत खेळलो आहे. मला असे वाटते की, तेही या गोष्टीचा विचार करत असतील.” (Bcci president Sourav Ganguly could play pivotal role making india vs pakistan series possible says Kamran akmal)
तसेच तो पुढे म्हणाला की, “आता सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंना देखील वाटत असेल की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जावी. परंतु याबाबत कुठलाही खेळाडू मोकळ्यापणाने बोलू शकत नाही. कारण त्यांच्या बोलण्याने वाद निर्माण होऊ शकतात. आयसीसी देखील दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवण्यात मोलाची भूमिका बजावू शकते. मुख्यतः विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवली गेली तर दोन्ही देशातील नातेसंबंधात सुधारणा होऊ शकते. ”
महत्वाच्या बातम्या –
पुजाराचे इग्लंडविरुद्ध कसोटीत बाकावर बसणे निश्चित? दिग्गजाने सुचवला त्याचा उत्तम ‘पर्याय’
ENGvIND: शेवटच्या वनडेपुर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कर्णधार मिताली राज पूर्णपणे फिट
विराट कोहलीच्या नेतृत्त्वपदावर टांगती तलवार, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळतील फक्त ४ महिने!