---Advertisement---

पुढील ३ जन्म सौरव गांगुलीला करायचंय हेच काम, स्वत: पोस्ट करत दिली माहिती

Sourav Ganguly
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली हा क्रिकेटमधील एक दिग्गज व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखला जातो. क्रिकेट खेळत असताना व क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही गांगुली सतत क्रिकेटशी जोडला गेलेला आहे. दुबईमध्ये आयपीएलचे आयोजन असो किंवा भर लॉकडाऊनमध्ये देशात आयपीएलचे काही सामने घेणे असो, गांगुलीची भूमिका यात कायमच महत्त्वाची राहिली. सध्या आयपीएलचा राहिलेला हंगाम पुर्ण करणे व भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या नियोजनात बीसीसीआयचा अध्यक्ष सध्या फारच व्यस्त आहे. असे असले तरी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची एक इच्छा चाहत्यांना सांगितली आहे.

गांगुलीने एक जुना फोटो शेअर केला असून यात तो भारतीय जर्सीमध्ये क्रिकेटमधील एक फटका मारताना दिसत आहे. या फोटोत गांगुलीचा थोडासा ॲग्रेसिव्ह लुकही दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना गांगुलीने म्हटले आहे, ‘माझी इच्छा आहे की पुढील तीन जन्म मी हेच काम करत राहिल.’ भारतीय संघाचा हा एक यशस्वी कर्णधार पुढील तीन जन्म भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे या पोस्टमध्ये दिसते.

https://www.instagram.com/p/CPBaC0gAxDS/

यावर अनेक चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका चाहत्याने ‘तुला क्रिकेट खेळताना पाहायला तीन जन्मही आवडेल’ असे लिहीले आहे. तर एका चाहत्याने ‘दादा तुला खेळताना पाहताना मजा येते’ असे असे लिहीले आहे. क्रिकेटपटू केदार जाधवनेही ही पोस्ट लाईक केली आहे.

Screengrab: Instagram/SOURAV GANGULY

गांगुली भारताकडून भारताकडून ११३ कसोटी व ३११ वनडे खेळला असून ५९ आयपीएल सामनेही त्याने खेळले आहेत. २००३ साली त्याने भारतीय संघाला आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गांगुली हा तीन अशा क्रिकेटपटूंपैकी आहे, जे पुढे जाऊन बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. यातील पुर्णवेळ अध्यक्षपद सांभाळणारा तो एकमेव आहे हे विशेष.

महत्त्वाच्या बातम्या – 

डेटवर येणार का? चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नाला मयंती लँगरने दिले होते भन्नाट उत्तर

कुलदीपने गेस्ट हाऊसमध्ये घेतला कोरोना लसीचा पहिला डोस? कानपूर प्रशानसाने दिले चौकशीचे आदेश

बाप तो बापच असतो!! इंग्लंड दौऱ्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरसाठी त्याच्या वडिलांनी सोडले घर, काय आहे कारण वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---