येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (indian premier league 2022) स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल स्पर्धेसाठी मेगा ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. दरम्यान महिला चॅलेंजर ट्रॉफी (women’s challenger trophy) स्पर्धा सुरू झाल्यापासून, महिलांची देखील आयपीएल स्पर्धा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. आता बीसीसीआयने याबाबत मोठी अपडेट दिली आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी म्हटले की, “मे महिन्यात पुन्हा एकदा महिला चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन केले जाईल. यासह महिला आयपीएल स्पर्धेचे (women’s ipl) देखील आयोजन केले जाणार आहे.” भारतीय महिला क्रिकेटपटूंना परदेशात होणाऱ्या लीग स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे महिला खेळाडू ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वुमेन्स बिग बॅश लीग आणि न्यूझीलंडमध्ये सुपर लीग स्पर्धेत खेळताना दिसून येत असतात.
गेल्या काही वर्षांपासून महिलांसाठी देखील आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु, बीसीसीआयने याबाबत कुठलाही विचार केला नव्हता. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
सौरव गांगुली यांनी लिहिले की, “भारतीय संघ येणाऱ्या काळात कसोटी मालिका खेळणार. आम्ही आयपीएल स्पर्धेचे आयोजन करू तसेच येणाऱ्या काळात महिलांच्या आयपीएल स्पर्धेचे मोठ्या स्तरावर आयोजन करू. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा खेळाडूंची संख्या वाढेल. यावर्षी देखील आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफ दरम्यान वुमेन्स चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन केले जाईल.” यापूर्वी देखील तीनवेळा आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफ दरम्यान वुमेन्स चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई व पुणे येथे होणार साखळी सामने
आयपीएल २०२२ मधील साखळी सामने मुंबई व पुणे येथे होणार असल्याचा पुनरुच्चार गांगुली यांनी केला. साखळी फेरीतील सामने मुंबई येथील तीन स्टेडियमवर तर पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर होतील. तर, प्ले ऑफ सामन्यांविषयी अध्यापक काही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
लवकरच पार पडणार आयपीएल स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा
लिलावासाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत ५९० खेळाडूंपैकी ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडू आहेत. या लिलावात भारतानंतर ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ४७ खेळाडू आहेत. ५९० खेळाडूंपैकी २२८ खेळाडू असे आहेत ज्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच ३३५ खेळाडू असे आहेत ज्यांनी अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीये. यासह सात खेळाडू नेपाळ, आयर्लंड आणि स्कॉटलंड इत्यादी देशांचे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
चालू वर्षी पुन्हा रंगणार ‘भारत-पाक क्रिकेटसंग्राम’; केव्हा? कोठे? घ्या जाणून
टी२० सामन्यात चहलने दिल्या तब्बल ६४ धावा, तरीही कॅप्टन धोनीने दिली ‘कूल’ प्रतिक्रिया; वाचा किस्सा
आयपीएलने पालटले सिराजचे आयुष्य, पहिल्या कमाईतून कुटुंबासाठी घेतलेली सेकंड हॅंड कार; तर स्वतःसाठी…