भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचेही समजत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार गांगुलीला शनिवारी (२ जानेवारी) सकाळी त्याच्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे त्याला लगेचच कोलकातामधील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
तसेच या वृत्ताला विक्रम गुप्ता आणि बोरिया मुजूमदार या पत्रकारांनीही दुजोरा दिला आहे. गांगुलीला अँजिओप्लास्टी झाल्यानंतर शनिवारीच घरी सोडण्यात येईल. त्याचे आरोग्य सध्या व्यवस्थित असल्याचे मुजूमदार यांनी सांगितले आहे.
Oh God, getting this terrible news of Sourav Ganguly being admitted in a hospital and getting an angioplasty done. @SGanguly99
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) January 2, 2021
He had a heart issue and is in Woodlands hospital. But is stable will need a procedure confirm hospital sources. Should be out of the woods in the next few hours. I wish him a speedy recovery. @SGanguly99
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) January 2, 2021
तसेच गांगुलीच्या जवळच्या एका सुत्राने एएनआयला सांगितले की ‘गांगुलीने छातीत दुखण्याबद्दल तक्रार केल्याने त्याला लगेचच दवाखान्यात हलवण्यात आले. त्याला कदाचीत अँजिओप्लास्टी करावी लागेल. सध्या तो ठिक आहे.’
गांगुलीने बुधवारी इडन गार्डलाही भेट दिली होती. त्याने अगामी सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तयारीविषयी बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष अविषेक दालमियाबरोबर चर्चाही खेळी होती. यावेळी त्याचा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा सचिव स्नेहाशिष गांगुली आणि सहसचिव देबब्रता दास हे देखील उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या –
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बाबर आझमला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार
याला म्हणतात प्रतिभा! केवळ १२ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हॅट्रिक घेणारा क्रिकेटर