भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची आई निरुपा गांगुली या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. निरुपा यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने सोमवारी रात्री (३० ऑगस्ट) त्यांना कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथेच त्यांची चाचणी केली असता त्या कोरोना संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘निरुपा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. याबरोबरच ४ डॉक्टरांची विशेष मेडीकल टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांना फक्त श्वास घेण्यात थोडा त्रास होत आहे. मात्र त्यांचे इतर आरोग्य मापदंड सामान्य आहेत.’
निरुपा यांची कोरोना चाचणी करतेवेळी तिथे उपस्थित सौरव गांगुलीचीही चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. निरुपा यांच्यापूर्वी त्यांचा मोठा मुलगा आणि गांगुलींचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.
यापूर्वी जानेवारी महिन्यात गांगुलींची प्रकृतीही खालावली होती. हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यावेळी अपोलो रुग्णालयात त्यांच्या हृद्याची ऍंजियोप्लास्टी केली गेली होती. २ जानेवारीला त्यांच्या छातीत त्रास होत होता. तसेच डोके जड होणे, उल्टी आणि चक्कर येणे, अशा समस्याही जाणवल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यावेळी त्यांना हा त्रास सुरू झाला होता; तेव्हा तो जवळपास त्याच्या घरच्या जिममध्ये व्यायाम करत होते.
या आजारपणातून बरे झाल्यानंतर गांगुली पुन्हा आपल्या क्रिकेटमधील कामांमध्ये व्यस्त झाले आहेत. ते लॉर्ड्स येथील ऐतिहासिक मैदानावर पार पडलेला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठीही आले होते. यावेळी त्यांनी आगामी टी२० विश्वचषकासंदर्भात कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चाही केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्यांची रणनिती काहीही असो, आम्ही सामना करण्यास सज्ज’; इंग्लंडची भारताला बॅकफूटवर ढकलण्याची तयारी
एक तीर दो निशान! अजिंक्यच्या पदार्पणाची ‘दशकपूर्ती’, पत्नीने शुभेच्छा देत टीकाकारांवरही साधला निशाणा