भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीला रविवारी(३१ जानेवारी) हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. त्याच्यावर काहीदिवसांपूर्वी दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
गांगुलीने बुधवारी(२७ जानेवारी) छातीत वेदना होण्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता त्याला घरी सोडण्यात आले आहे.
Good news :BCCI president SouravGanguly has been discharged from hospital todaypic.twitter.com/M3KOunpwat
— K I R A N 🇮🇳 (@Kiran_reddy_k) January 31, 2021
२६ दिवसांच्या अंतराने दोन अँजिओप्लास्टी
सौरव गांगुलीवर २६ दिवसांच्या अंतराने दोनदा अँजिओप्लास्टी करण्यात आली. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. देवी शेट्टी व अश्विन मेहता, तसेच गांगुलीचे खाजगी चिकित्सक डॉ. आफताब खान यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. त्यांनतर गांगुलीला काही दिवस निगराणीखाली ठेवण्यात आले.
गांगुलीवर यापूर्वी ३ जानेवारी रोजी पहिल्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यात ३ ब्लॉकेजेस असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत ३ जानेवारीला एक स्टेंट टाकण्यात आला होता. या शस्त्रक्रियेनंतर गांगुली यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे ते ७ जानेवारीपासून आपल्या निवासस्थानीच होते.
यानंतर त्याला पुुन्हा २७ जानेवारीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुन्हा स्टेंट टाकण्यात आले. त्याची ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून, डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. आता त्याला घरी देखील सोडण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चालू सामन्यात अंपायरला शिवीगाळ करत खेळाडूने ओढवले संकट, झाला लाखोंचा दंड
आयपीएल प्रेमींसाठी खुशखबर; भारतातच होणार आयपीएल २०२१ चे आयोजन ?
भारताला पराभूत करायचं असेल तर ‘ही’ गोष्ट करावीच लागेल, इंग्लंडच्या स्टार खेळाडूची प्रतिक्रिया