---Advertisement---

क्रिकेट क्षेत्रातील बेकारी वाढली, कोचच्या पदासाठी आले हजारो अर्ज

On: गुरूवार, ऑगस्ट 1, 2019 5:43 PM
---Advertisement---

बीसीसीआयने भारताच्या वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवले होते. हे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारिख 30 जूलै होती. त्यामुळे अंतिम तारखेपर्यंत बीसीसीआयकडे मुख्य प्रशिक्षकासाठी आलेल्या अर्जांचे आकडे थक्क करणारे आहेत.

मिररने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयकडे मुख्य प्रशिक्षकासाठी तब्बल 2000 अर्ज आले आहेत. या वृत्तात असेही म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मुडी यांनीही या पदासाठी अर्ज केला आहे.

तसेच न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आणि सध्याचे किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक माईक हेसन यांनीही अर्ज केला आहे. तसेच भारतीयांमध्ये या पदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये रॉबिन सिंग आणि लालचंद राजपूत यांचा समावेश आहे.

तसेच मधे माहेला जयवर्धने देखील या पदासाठी अर्ज करणार असल्याचे म्हटले जात होते. पण त्याने त्याचा अर्ज पाठवलेला नाही. त्याचबरोबर मिररने दिलेल्या वृत्तानुसार अनेक अर्ज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उमेदवारांच्या एजंटकडून पाठवण्यात आले आहेत.

याबरोबरच क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने अर्ज केला आहे.

भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार 2019  विश्वचषकानंतर संपणार होता. पण त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या भारताच्या विंडीज दौऱ्यासाठी रवी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ भारतीय संघाबरोबर कायम असतील.

पण त्यानंतर बीसीसीआय नव्याने मुख्य प्रशिक्षक आणि अन्य सपोर्ट स्टाफची नियुक्ती करणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. तसेच नव्याने प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती करताना शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांना देखील या पदांसाठी मुलाखत देता येणार आहे.

भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी सल्लागार समीतीमध्ये कपिल देवबरोबरच माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश आहे. हे मध्य ऑगस्टमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

‘हिटमॅन’ रोहित शर्माने केलेला हा खास ट्विट होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल…

मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स संघात झाली या खेळाडूंची अदला-बदली

पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे ११ जणांचा इंग्लंड संघ, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment