बांग्लादेशात आरक्षणाच्या आंदोलनामुळे देशात खळबळ उडाली आहे. आता या अंदोलनाचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे कारण बांग्लादेशमध्ये 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान महिला टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. दरम्यान, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) भारताला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची विनंती केली होती. आता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जय शाह म्हणाले, “बांग्लादेश बीसीसीआयला महिला टी-20 विश्वचषकाचे आयोजन करू शकते का, असे विचारले होते, परंतु मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. आम्हाला महिला एकदिवसीय विश्वचषकही आयोजित करायचा आहे. मला असा गैरसमज पसरवायचा नाही की केवळ आम्हालाच (भारतात) विश्वचषक स्पर्धा सतत आयोजित करायच्या आहेत.”
बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमुळे महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती चिंताजनक असल्याने आयसीसी देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली नाही तर आयसीसी या प्रकरणी मोठा निर्णय घेऊ शकते. महिला टी20 विश्वचषक स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल.
दरम्यान, बांग्लादेश पुरुष संघाच्या सरावावरही परिणाम झाला. देशात होत असलेल्या निदर्शनेमुळे बांग्लादेशचा संघ नियोजित वेळापत्रकापूर्वीच पाकिस्तानला रवाना झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान दोन कसोटी सामने होणार असून ही मालिका 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सर्वप्रथम बांग्लादेशचा संघ 17 ऑगस्टला पाकिस्तानला जाणार होता. पण सराव, विरोध आणि इतर अनेक बाबी लक्षात घेऊन संघ 5 दिवस आधीच पाकिस्तानला गेला.
हेही वाचा-
‘मैं पल दो पल का शायर…’, जेव्हा धोनीने चाहत्यांची मने तोडली, या क्रिकेटपटूनेही केले होते आश्चर्यचकित
भारतात होणार ऑलिम्पिक? पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून केली घोषणा; लवकरच होणार देशवासींयाचे स्वप्न पूर्ण
सीएसकेच्या स्टार खेळाडूने केंद्रीय करार नाकारला, टी20 लीगला दिले प्राधान्य; मुख्य संघाला मोठा धक्का