काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्यासाठी आपल्या देशात येण्याची ऑफर पाठवली होती. ऑफरनुसार, टीम इंडियाची इच्छा असल्यास ते दिल्ली किंवा चंदीगडमध्ये आपला सेटअप करू शकतात आणि पाकिस्तानमध्ये सामना खेळल्यानंतर लगेच भारतात परत येऊ शकतात. परंतु बीसीसीआयनं पीसीबीची ही ऑफर स्पष्टपणे नाकारल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, भारतीय बोर्डाला पीसीबीकडून असा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय पूर्णपणे भारत सरकारच्या हातात आहे. याशिवाय, पीसीबीकडूनही कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. परंतु असा दावा करण्यात आला की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आधीच माहिती होती की भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी त्यांच्या देशात येण्यास नकार देऊ शकतो. परंतु पीसीबी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास अजिबात तयार नाही.
काही दिवसांपूर्वी आयसीसीचे काही अधिकारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानात आले होते. आता 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान दुबईत आयसीसी बोर्ड सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीबाबत पीसीबीच्या एका सूत्रानं सांगितलं की, पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या देशात आयोजित करायची आहे. याशिवाय, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांनी आधीच अशी मानसिक स्थिती तयार केली आहे की त्यांना आयसीसीच्या बैठकीत भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो.
असंही सांगण्यात आलं आहे की, पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचं यजमानपद कोणत्याही परिस्थितीत गमावायचं नाही. भारत फायनलसाठी पात्र ठरला तरी पीसीबी आपली ही भूमिका बदलणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार, भारताचे सर्व सामने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या मैदानालाच फायनलसाठी मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा –
न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप विजयामागे भारताचा हात, कर्णधार सोफी डेव्हाईननं केला मोठा खुलासा
अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीत जलवा, संघाला मिळवून दिला एकतर्फी विजय!
विश्वास करणे कठीण, सलग 10 सामने हरलेला संघ बनला विश्वविजेता!