आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ येत आहे. पण त्याआधी भारतीय क्रिकेट संघाला टी20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचे आव्हान पार करावे लागेल. काही दिवसांपूर्वी अशी अटकळ होती की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर काही वरिष्ठ खेळाडूंना इंग्लंड मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. यामध्ये केएल राहुलचेही नाव होते. ज्याच्याबद्दल असे म्हटले जात होते की चॅम्पियन्स ट्रॉफी संघात त्याचे स्थान निश्चित आहे. परंतु त्याला इंग्लंड मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. आता असे दिसते की संघ व्यवस्थापनाने आपला निर्णय बदलला आहे.
वृत्त अहवालानुसार, बीसीसीआयने केएल राहुलला 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्यास सांगितले आहे. राहुलने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सर्व 5 सामने खेळले होते. त्यानंतर आता त्याला जवळजवळ दीड महिन्याच्या मालिकेनंतर राहुलला विश्रांती मिळेल अशी अपेक्षा होती. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या बाद फेरीच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णयही घेतला आहे. पण आता असे दिसते की त्याचे पुनरागमन लवकरच होणार आहे.
The BCCI has asked KL Rahul to participate in the ODI series Vs England. (Gaurav Gupta/TOI). pic.twitter.com/htuvNfSzrE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 10, 2025
इंग्लंडविरुद्धची ही एकदिवसीय मालिका 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सराव मालिका म्हणून काम करेल. राहुल हा भारताच्या एकदिवसीय संघाचा नियमित भाग आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यात त्याने फक्त 31 धावा केल्या. तर 2023 च्या विश्वचषकात राहुलने 75 पेक्षा जास्त सरासरीने 452 धावा केल्या होत्या. आता टीम इंडियाला राहुलकडून चॅम्पियन्स ट्राॅफीमध्येही अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असेल.
राहुलने आतापर्यंत 77 एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत 2851 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने 7 शतके आणि 18 अर्धशतके केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 49 पेक्षा जास्त आहे. जी त्याला केवळ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतच नव्हे तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकते.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी मोठी अपडेट, या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा
“रिषभ पंत प्रत्येक डावात शतक करू शकतो” माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अनुभवी फलंदाजाची निवृत्ती, संघाला मोठा धक्का