---Advertisement---

मालिका पुढे ढकलण्याबरोबरच श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे बीसीसीआयने केली होती ‘ही’ मोठी मागणी

---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या मालिकेवर कोरोनाचे सावट पसरले आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंकन संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जिटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बीसीसीआयने मालिका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ही मागणी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मान्य केली आहे. तसेच आता १३ जुलै ऐवजी १८ जुलैपासून वनडे मालिका सुरु होईल. तसेच कोरोनाची वाढती भीती पाहता बीसीसीआयने आणखी एक मागणी केली होती. ज्यावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने शिक्कामोर्तब केले आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डासोबत जोडलेल्या एका सूत्राने डेक्कन क्रॉनिकलला सांगितले की, “श्रीलंकन संघाचे हॉटेल बदलण्यात यावे अशी मागणी बीसीसीआयने केली होती. त्यांनी असे केले कारण, श्रीलंकन संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि डेटा विश्लेषक यांना कोरोनाची लागण झाली होती. बीसीसीआयला या बाबतीत कुठलीच जोखीम घ्यायची नाही. श्रीलंकन संघाला कोलंबोच्या ग्रँड सिनामन हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. हे हॉटेल भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये आहे, त्या हॉटेलपासून १.५ किमी अंतरावर आहे.(BCCI request Sri Lankan cricket team to shift another hotel due to Covid 19)

नवीन वेळापत्रकानुसार १८ जुलै पासून सुरू होणार मालिका
नवीन वेळापत्रकानुसार भारत श्रीलंका मालिका येत्या १८ जुलै पासून सुरू होणार आहे. भारतीय संघासाठी आनंदाची बाब अशी की भारतीय संघातील एकही खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही. भारतीय संघातील खेळाडूंची पुढील आरटी-पीसीआर चाचणी १२ जुलै रोजी होणार आहे.

ही चाचणी झाल्यानंतर भारत आणि श्रीलंका या संघातील वनडे मालिकेला १३ जुलैपासून प्रारंभ होणार होता. परंतु, श्रीलंका संघांचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह अढळल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता सुधारीत वेळापत्रकानुसार ही मालिका १८ जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.

तसेच यजमान संघातील खेळाडूंची चाचणी येत्या सोमवारी केली जाणार आहे.

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग

महत्वाच्या बातम्या-

रिचा घोषमध्ये दिसली धोनीची झलक, विजेच्या वेगाने फलंदाजाला केले यष्टिचीत, पाहा व्हिडिओ

भारतीय वेगवान गोलंदाजाची अचानक निवृत्ती, घेतले आहेत ४७२ बळी

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ६- २०१९ विश्वचषक उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये काय झाले?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---