यूएई येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला सलग दोन मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या या पराभवांमुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याच्या मार्ग अवघड झाला आहे. भारताच्या या पराभवानंतर अनेक लोक भारतीय खेळाडूंवर टीका करत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूने विचार केल्यास यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
वर्षभरात भारतीय खेळाडूंनी खेळले अतिक्रिकेट
भारतीय खेळाडू सप्टेंबर २०२० पासून सतत खेळत आहेत. आयपीएल २०२० चा हंगाम युएईमध्ये झाला. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान मायदेशात तीनही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिका खेळल्या गेल्या. ही मालिका संपताच आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा खेळला गेला, जो कोरोनामुळे हंगामाच्या मध्यावर पुढे ढकलण्यात आला. यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला गेला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु झाली. याच दरम्यान भारताचा दुय्यम संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिका खेळत होता.
कोरोनामुळे इंग्लंडमधील पाचवी कसोटी रद्द झाल्यावर भारतीय क्रिकेटपटू आयपीएलच्या उत्तरार्ध खेळण्यासाठी यूएईला पोहोचले. फ्रँचायझींच्या अत्यंत स्पर्धात्मक आणि गंभीर दबावाखालील आयपीएल खेळल्यानंतर दोन दिवसांनी त्याने विश्वचषकाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला.
इतक्या मालिकांचे वेळापत्रक एकत्र वाचून दमछाक व्हायला होते. त्यात खेळणाऱ्या खेळाडूंचे काय झाले असेल याची कल्पना करा. दोन हंगामातील १२० सामने आणि आयपीएलच्या तीन टप्प्यांव्यतिरिक्त, ७६ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत भारतीय खेळाडूंचा सहभाग होता. याशिवाय काही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटही खेळले आहे.
सतत बायो-बबलमध्ये राहिल्याने खेळाडूंना मानसिक तणावाला देखील सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारे भारतीय खेळाडू एका वर्षातील जवळपास २०० दिवस कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रिकेट मैदानावर होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरकडे असू शकते मोठी मागणी, ‘या’ संघांची असेल त्याच्यावर नजर
बीसीसीआय आली ऍक्शनमध्ये! टी२० सह वनडे संघाचा कर्णधार होणार रोहित?
शमी आणि चक्रवर्तीची होणार सुट्टी? अफगानिस्तानविरुद्ध ‘या’ २ भारतीय गोलंदाजांची होऊ शकते एन्ट्री