---Advertisement---

रोहित-कोहलीसह भारतीय क्रिकेटपटूंचे करियर आता या माजी खेळाडूच्या हाती

---Advertisement---

बीसीसीआयच्या (BCCI) क्रिकेट सल्लागार समितीने (Cricke Advisory Committee) (सीएसी) राष्ट्रीय निवड समितीची दोन रिक्त पदे भरण्यासाठी आज (4 मार्च) 5 उमेदवारांची मुलाखत घेतली होती. यामध्ये सीएसीने दोन उमेदवारांची नावे निवडली आहेत.

सीएसीने भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल जोशी (Sunil Joshi) आणि हरविंदर सिंग (Harvinder Singh) यांना राष्ट्रीय निवड समितीमध्ये निवडकर्ता म्हणून निवडले आहे. त्याचबरोबर क्रिकेट सल्लागार समितीने जोशी यांना राष्ट्रीय निवड समितीचा (पुरुष संघ) अध्यक्ष बनविण्याची शिफारस देखील केली आहे.

भारतीय संघाच्या निवड समितीच्या दोन सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा समावेश आहे. प्रसाद हे या समितीचे अध्यक्ष होते. आता प्रसादच्या जागी सीएसीने बीसीसीआयला जोशी यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सीएसीने या दोन पदांसाठी 5 उमेदवारांना मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात बोलावण्यात आले होते. जोशी आणि हरविंदरव्यतिरिक्त वेंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि राजेश चौहान यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.

निवडकर्त्यांची निवड करण्यासाठी 3 सदस्यीय सल्लागार समिती निवडण्यात आली होती. त्यामध्ये भारतीय संघाचे माजी खेळाडू मदन लाल, आर. पी. सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश होता.

49 वर्षीय जोशी गोलंदाज असून त्यांनी भारताकडून 15 कसोटी आणि 69 वनडे सामने खेळले आहेत. यापूर्वी जोशींनी बांगलादेशच्या राष्ट्रीय संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. तर हरविंदर यांनी 3 कसोटी आणि 16 वनडे सामने खेळले आहेत.

नवीन निवडसमिती 12 मार्चपासून होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करेल. या मालिकेतील पहिला सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 12 मार्चला धर्मशाळा येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महिला टी२० विश्वचषक: पावसामुळे सेमीफायनलचे सामने रद्द झाले तर हे संघ जाणार फायनलमध्ये

खेळपट्टीवर “रहाणे” कितपत योग्य?

‘कॅप्टनकूल’ धोनी म्हणतो, चेन्नई सुपर किंग्सने शिकवल्या या गोष्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---