भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाला 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून टी20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं. यासह त्यांनी भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही जाहीर केली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जय शहा यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन केलं. शाह म्हणाले की, या संपूर्ण टी20 विश्वचषकात भारतीय संघानं शानदार खेळ केला. तसेच जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखववली.
जय शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना आनंद होत आहे. संघानं संपूर्ण स्पर्धेत दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन केलं. या अद्भुत कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन.”
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं शनिवारी (29 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. हा भारताचा चौथा विश्वचषक विजय आहे. टीम इंडियानं यापूर्वी दोनदा (1983, 2011) एकदिवसीय विश्वचषक, तर एकदा (2007) टी20 विश्वचषक जिंकला होता.
2024 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे होता –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या –
निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकचं पुनरागमन, आयपीएल 2025 साठी आरसीबीनं सोपवली मोठी जबाबदारी!
जिथे-तिथे फक्त ‘किंग’ कोहलीचीच हवा! वर्ल्डकपच्या एका पोस्टने मोडले सोशल मीडियाचे सर्व रेकाॅर्ड
पुढील टी20 विश्वचषक कधी आणि कुठे खेळला जाणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट