भारतीय संघातील बरेच खेळाडू दुखापतींशी झगडत असल्याचे दिसत आहे. या खेळाडूंमध्ये प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाचा देखील समावेश आहे. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून आयर्लंड विरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत खेळताना दिसणार असल्याचे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे.
बुमराह एप्रिल महिन्यात झालेल्या पाठीच्या सर्जरीनंतर सातत्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती प्राप्त करण्यासाठी मेहनत घेत होता. तो दिवसातून दहा षटके पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत असल्याचे सांगण्यात आलेले. त्यामुळे तो लवकरच भारतीय संघात दिसेल असा कयास लावण्यात येत होता. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार,
‘बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी20 मालिकेसाठी त्याची निवड अपेक्षित आहे.”
भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. यानंतर होणाऱ्या आशिया चषक व विश्वचषकाच्या दृष्टीने बुमराह भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. तो विश्वचषकात मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांच्यासोबत भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणाची धुरा वाहिल.
जसप्रीत बुमराह मागील बऱ्याच महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे पाठीची सर्जरी करावी लागली. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये आपण पुनरागमनासाठी तयार असल्याचे तो म्हणताना दिसलेला.
(BCCi Secretary Jay Shah Confirmed Bumrah is fully fit And Available For Ireland Series)
महत्त्वाच्या बातम्या-
संजूला बाकावर बसवल्याने उठले वादळ! चाहते म्हणतायेत, ‘मुंबई आणि उत्तर भारतीय लॉबी…’
“टीम इंडियाला रोहित-विराटची गरज नाही”, श्रीलंकेच्या दिग्गजाचे मोठे वक्तव्य