वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (27 जुलै) बार्बाडोस येथे सुरू झाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने या सामन्यातून वनडे पदार्पण केले. मात्र, त्याचवेळी यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याला संधी न दिल्याने चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
पहिल्या वनडेत भारतीय संघाने 5 फलंदाजांना संधी दिली. तर, तीन अष्टपैलू संघात समाविष्ट केले. यष्टीरक्षक म्हणून ईशान किशन व मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव याला संधी दिली गेली. त्यामुळे अनेकांनी भारतीय संघ व्यवस्थापन व कर्णधार रोहित शर्मावर टीका केली.
भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या वनडे विश्वचषकाची तयारी करत आहे. काही निवड समिती सदस्यांनी संजू याचा विश्वचषकासाठी विचार होत असल्याचे म्हटलेले. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा काहीशी निरस कामगिरी असलेल्या सूर्यकुमार व ईशान यांना संधी दिल्याने अनेकांनी संघ व्यवस्थापनाला धारेवर धरले.
Rohit, Dravid and team india management destroying #SanjuSamson career. Nothing new🔥it's clearly evidant . idk why Surya in elevan .he is flop in odi
It's clearly Mi/North Indian lobby pic.twitter.com/5kpK34fQOs— Adwaith (@Adwaith02121) July 27, 2023
एका चाहत्याने लिहिले, ‘रोहित, द्रविड आणि संघ व्यवस्थापन संजूची कारकीर्द संपवत आहेत. स्पष्टपणे दिसून येत आहे की मुंबई आणि उत्तर भारतीय लॉबी इथे काम करते.’
Mr @ImRo45,
what sanju have to do for getting into playing 11 ???#sanjusamson pic.twitter.com/SiT4FedZLL— Aftu (@Aftu_X) July 27, 2023
अन्य एकाने लिहिले, ‘प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी संजूला काय करावे लागेल?’
आकडेवारीचा विचार केल्यास सूर्यकुमार यादव हा मागील पाच पैकी चार वनडे सामन्यांमध्ये खाते ही खोलू शकला नाही. तर, ईशान किशन वर्षभरात केवळ एका द्विशतकाव्यतिरिक्त अर्धशतकही झळकावू शकला नाही. दुसरीकडे, संजूने आत्तापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यांमध्ये 66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
(Fans Gets Angry After Sanju Samson Benched In ODI Against West Indies)
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप खेळणार का? वनडे रिटायरमेंट घेतलेला स्टोक्स पाहा काय म्हणाला?
आजपासून टीम इंडियाचे ‘मिशन वर्ल्डकप’! वाचा भारतीय संघाचे विश्वचषकापर्यंतचे सर्व वेळापत्रक