आयपीएल मधील 2023 च्या मोसमापासून इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू करण्यात आला होता, ज्यावर अलीकडील मोसमात बरीच टीका झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी या नियमाला विरोध केला होता. तेव्हापासून हा नियम आयपीएल 2025 मध्ये कायम ठेवला जाईल की नाही अशी अटकळ बांधली जात आहे, आता बीसीसीआयचे सचिव जय शाहांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल 2024 मधील खेळाडूंच्या इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे आपल्याला बरेच उच्च स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले. त्यामुळे गोलंदाजांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यासोबतच अष्टपैलू खेळाडूंची भूमिकाही जवळपास संपुष्टात आली होती. याच कारणामुळे या नियमाला खूप विरोध झाला होता आणि आता जय शहांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. हे मान्य केल्याचे मान्य केले आहे.
आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत बोलताना जय शाह म्हणाले की फ्रँचायझी मालकांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत आमची याबाबत दीर्घ चर्चा झाली. आम्ही देशांतर्गत संघांमध्येही बोललो. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू आहेत. नकारात्मक म्हणजे त्याचा अष्टपैलू खेळाडूंवर परिणाम होतो आणि सकारात्मक म्हणजे अतिरिक्त भारतीय खेळाडूला संधी मिळते. ब्रॉडकास्टरचाही विचार करायला हवा. व्यस्थापक म्हणून खेळ माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. याविषयी आम्हाला आणखी काय प्रतिक्रिया मिळतात ते पाहूया.
इम्पॅक्ट प्लेयर नियमाबाबत सांगायचे झाल्यास तर ते असे, फलंदाजी करणाऱ्या संघाला गरज भासल्यास खेळाडू वगळून गोलंदाजाचा समावेश करण्याचा पर्याय मिळतो. नाणेफेक दरम्यान, दोन्ही संघांचे कर्णधार त्यांच्या खेळाडूंची यादी सादर करतात ज्यांचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर केला जाऊ शकतो. आयपीएल 2024 मध्ये आम्ही अनेक मोठे खेळाडू हा नियम वापरताना पाहिले. मात्र, त्याच्या आगमनाने अष्टपैलू खेळाडूंची उपयुक्तता कमी झाली आहे. संघांमध्ये गरजेनुसारइम्पॅक्ट प्लेयर म्हणून विशेषज्ञ फलंदाज किंवा गोलंदाजांचा समावेश होतो.
हेही वाचा-
काय सांगता.! आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांची चक्क इतक्या रुपयांची कमाई, पाहा सर्वात महागडा कोण?
भारतात विश्वचषक आयोजित करा; जय शहांनी या कारणास्तव फेटाळली विनंती; म्हणाले, आम्ही नाही…
‘मैं पल दो पल का शायर…’, जेव्हा धोनीने चाहत्यांची मने तोडली, या क्रिकेटपटूनेही केले होते आश्चर्यचकित