जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला 31 मार्चपासून सुरूवात होत आहे. या हंगामात सर्वच प्रमुख भारतीय खेळाडू खेळताना दिसतील. भारतीय क्रिकेटसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण, आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना तसेच वनडे विश्वचषक खेळायचा आहे. त्यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
आयपीएलच्या पुढील हंगामात भारतीय संघात असणारे सर्वच प्रमुख खेळाडू खेळणार आहेत. आयपीएलच्या दरम्यान अनेक खेळाडूंना दुखापती होत असतात. त्यादृष्टीने बीसीसीआयने या सर्व खेळाडूंवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एमसीए) यांना सांगितले आहे.
बीसीसीआय सचिव जय शहा व एनसीए संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नुकतीच बैठक झाली. यामध्ये शहा यांनी खेळाडूंच्या दुखापतींबाबत लक्ष्मण यांच्याकडून माहिती घेतली. तसेच आगामी आयपीएलमध्ये भारताच्या कसोटी व वनडे संघाचा भाग असलेल्या खेळाडूंवर लक्ष ठेवण्याची सूचना केली. या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत त्या खेळाडूंच्या फ्रॅंचाईजी सोबत सातत्याने चर्चा करण्यास देखील सांगितले आहे. तसेच, सध्या एनसीएमध्ये असलेल्या खेळाडूंच्या दुखापती व पुनर्वसन कार्यक्रमाची देखील त्यांनी माहिती घेतली.
भारतीय संघाला सध्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. जवळपास पाच महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बाजूला राहिलेल्या मागील महिन्यातच पुनरागमन केले होते. तर, जसप्रीत बुमराह हा ऑगस्ट महिन्यापासून पाठीच्या दुखण्यामुळे क्रिकेटपासून लांब आहे. त्याच्यावर सर्जरी झाली असून तो जुलै-ऑगस्ट महिन्यात खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर आता संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर याला देखील पाठीच्या दुखण्याचा त्रास होत आहे.
(BCCI Secretary Jay Shah has instructed the NCA Head VVS Laxman to keep a close eye of India Test & ODI players to monitor their workload through the IPL)
महत्वाच्या बातम्या-
योगायोग असावे तर असे! 2008 ची सीएसके आणि WPL च्या मुंबई इंडियन्सचे जुळून आलेले जबरदस्त साधर्म्य
अफगाणिस्तान क्रिकेटचा सुवर्णदिन! इतिहासात प्रथमच नोंदवला पाकिस्तानवर विजय, नबी चमकला