---Advertisement---

कोरोनाची मार! भारत-श्रीलंका वेळापत्रकात पुन्हा बदल, जय शहा यांनी सांगितली अधिकृत तारिख

On: शनिवार, जुलै 10, 2021 3:00 PM
---Advertisement---

भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. तत्पुर्वी यजमान श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने या दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यावरुन आल्यानंतर श्रीलंका संघाचा फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर आणि डेटा ऍनॅलिस्ट कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर वेळापत्रकात बदल करण्याची ही दुसरी वेळ आहे.

सुरुवातीला सांगण्यात आले होते की, या दौऱ्याला १३ जुलैपासून नव्हे तर १७ जुलैपासून वनडे सामन्याने सुरुवात होईल. मात्र शनिवारी (१० जुलै) स्वत: बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना जय शहा म्हणाले की, ‘भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारी ३ सामन्यांची वनडे मालिका १८ जुलैपासून सुरू होणार आहे. श्रीलंका संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.’

त्यामुळे आता दुसरा वनडे सामना २० जुलै आणि तिसरा व शेवटचा वनडे सामना २३ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. तर २५ जुलै रोजी टी२० मालिकेची सुरुवात होऊन २९ जुलै रोजी तिसऱ्या व शेवटच्या टी२० सामन्याने हा दौरा संपन्न होऊ शकतो.

या मालिकांसाठी श्रीलंकेने अजून संघ घोषित केलेला नाही. पण, भारताचा संघ घोषित झाला असून सध्या श्रीलंकेत आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. तसेच भारतीय खेळाडू दोन संघ बनवून आपापसांत इंट्रास्क्वॉड सराव सामनेही खेळत आहेत.

तर बीसीसीआयच्या मागणीनंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना कोलंबोमधील दुसऱ्या हॉटेलमध्ये हालवण्यात आले आहे. सुरुवातीला भारत आणि श्रीलंका संघ तास समुद्रा या हॉटेलमध्ये एकत्र थांबले होते. परतु आता त्यांना ग्रँड सिनामन हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानी अंपायरने चुकीचा निर्णय देऊन देखील ‘लिटल मास्टर’ने मोडला होता ब्रॅडमन यांचा विक्रम

आनंदाची बातमी! दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग दुसऱ्यांदा बनला बाबा, झाली पुत्ररत्न प्राप्ती

‘अरे इतके तर मुलेसुद्धा डीपी बदलत नाहीत,’ सतत कर्णधार बदलल्याने जाफरने श्रीलंकाची केली थट्टा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---