यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानकडे आहे. पण या मेगा स्पर्धेच्या अगदी आधी, भारतीय संघाच्या जर्सीवरून वाद निर्माण झाला होता. भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नसल्याचा दावा केला जात होता. पाकिस्तान यजमान असल्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर आयसीसीच्या (ICC) लोगोसह यजमान देशाचे नाव दिसते. आता या प्रकरणावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) प्रतिक्रिया आली आहे.
जर्सीच्या मुद्द्यावर बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया (Devajit Saikia) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, देवजीत सैकिया म्हणाले की, “आम्ही आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू. आयसीसी जे काही निर्देश देईल ते आम्ही करू.”
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लोगोसोबतच भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नावही असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी, भारतीय संघाच्या जर्सीवरून सुरू असलेला वाद आता थांबणार आहे.
खरेतर असा दावा केला जात होता की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमान देशाचे नाव पाकिस्तान हे भारतीय संघाच्या जर्सीवर नसेल. या स्पर्धेसाठी भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाणार नाही. त्यामुळे त्यांचे सर्व सामने हायब्रीड माॅडेल अंतर्गत दुबई, यूएई येथे खेळवले जाणार आहेत. त्यामुळे, भारतीय संघ फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो जर्सीवर ठेवेल असा वाद निर्माण झाला. पण आता बीसीसीआयच्या सचिवांनी यावर परिस्थिती स्पष्ट केली आहे.
2025च्या चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल. रिषभ पंत, रवींद्र जडेजा
अधिक वाचा-
IND vs ENG; पहिलाच टी20 सामना अन् भारतीय खेळाडूंच्या निशाण्यावर 3 मोठे रेकाॅर्ड्स
‘मित्रामुळे भेट झाली, नंतर प्रेमात पडले….’, रिंकू सिंग-प्रिया सरोजची लव्ह स्टोरी खूपच रंजक
सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, टीम इंडिया इतक्या वर्षापासून टी20 मालिकेत अपराजित