ऑस्ट्रेलियात होणारा टी20 विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघा दोन आठवड्यांचा शिल्लक राहिला आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जातेय. अनुभवी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषकात सहभागी होईल. तब्बल दीड दशकांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ भारतीय संघ यावेळी संपवू इच्छितो. त्यासाठी आता संघ व्यवस्थापन व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) योजना बनविली आहे.
भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी दोन अधिकृत सराव सामने खेळायचे आहेत. प्रथम 17 ऑक्टोबरला यजमान ऑस्ट्रेलियाशी आणि त्यानंतर 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी भारतीय संघ भिडणार आहे. हे दोन्ही सामने ब्रिस्बेन येथे होणार आहेत. विश्वचषकातील भारताच्या मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. सुपर 12 मध्ये पाकिस्तान व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश भारताच्या गटात आहेत. त्याचवेळी आणखी दोन संघ पात्रता फेरी खेळून मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील.
विश्वचषक ऑस्ट्रेलियात होत असल्याने तेथील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना पूरक आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांना तेथील खेळपट्ट्यांवर वेगवान चेंडूंचा सराव व्हावा यासाठी बीसीसीआयने काही भारतीय वेगवान गोलंदाजांना भारतीय संघासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघासाठी यावर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक व आयपीएलमधून चमकलेला मध्य प्रदेशचा कुलदीप सेन हे वेगवान गोलंदाज भारतीय संघासोबत नेट बॉलर म्हणून असतील. उमरान सातत्याने 150 किमी प्रतितास तर कुलदीप 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. या दोघांसह भारतीय संघासह काही राखीव गोलंदाजही असतील. तसेच दोन फिरकी गोलंदाजांनाही नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाची वारी करण्याची संधी मिळणार आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारताचा संपूर्ण संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची ‘फिफ्टी’, भारताचे श्रीलंकेसमोर 151 धावांचे लक्ष्य
स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीला पंतने केले खुश! दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल