---Advertisement---

मैदानातच नाही, तर मैदानाबाहेरही दीपक चाहरचा जलवा! गिटार वाजवत रंगवली जुन्या गाण्यांची मैफील, व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, जुलै 23, 2021 12:38 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या वेगवान गोलंदाज दीपक चाहरची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्याने मंगळवारी (२० जुलै) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे. अशातच, आता त्याचा एक नवा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका वेगळ्याच भूमीकेत दिसत आहे.

गिटार वाजवतोय दीपक 
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की दीपक गिटार वाजवत असून त्याची आणि श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या मर्यादीत षटकांचे फिजिओ निरंजन पंडीत यांच्यात जुन्या गाण्यांची मैफील रंगली आहे. ते ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘है अपना दिल तो आवारा’, ‘एक अजनबी हसीना से’ असे काही जुनी हिंदी गाणी गाताना दिसत आहेत.

या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. तसेच सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1418230817986392064

चाहरने यापूर्वीही त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर गिटार वाजवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

श्रीलंका दौऱ्यात दीपकची अष्टपैलू कामगिरी
सध्या भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारताला ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. वनडे मालिकेतील पहिले २ सामने पूर्ण झाले आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवून वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा दीपक चाहर हिरो ठरला. त्याने या सामन्यात प्रथम गोलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर श्रीलंकेने दिलेल्या २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९३ धावांवरच ७ विकेट्स गमावल्या होत्या, अशा परिस्थितीत दीपकने भुवनेश्वर कुमारसह ८ व्या विकेटसाठी नाबाद ८४ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने या सामन्यात अखेरच्या षटकात विजय मिळवला.

या सामन्यात दीपकने फलंदाजी करताना नाबाद ६९ धावांची खेळी केली. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्याने पहिल्या सामन्यात दीपकने २ विकेट्स घेतल्या होत्या.

या श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी (२३ जुलै) होणार आहे. त्यानंतर २५ जुलैपासून ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर अख्ख्या श्रीलंका संघाला ठोठावण्यात आला दंड, ‘हे’ आहे कारण

बाजीगर रिषभ! कोरोनावर मात करून परतल्यानंतर टीम इंडियाने पंतचे असे केले ‘ग्रँड वेलकम’, पाहा फोटो

रवी शास्त्री यांच्याऐवजी द्रविडकडे द्यायला हवे का भारताचे प्रशिक्षकपद? माजी क्रिकेटरने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---