---Advertisement---

बाजीगर रिषभ! कोरोनावर मात करून परतल्यानंतर टीम इंडियाने पंतचे असे केले ‘ग्रँड वेलकम’, पाहा फोटो

---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ मालिकेपूर्वी काउंटी एकादश संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळत आहे. या सामन्यात भारताचे अनेक महत्त्वपूर्ण खेळाडू खेळत नाहीत. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे व अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी या सामन्यातून विश्रांती घेतली होती. तर, भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक रिषभ पंत कोरोना पॉझिटिव आल्याने या सामन्यात खेळू शकला नव्हता. रिषभ कोरोनातून बरा झाल्यानंतर नुकताच संघात पुन्हा सामील झाला. त्याचे भारतीय संघाने दमदार स्वागत केले. त्याबद्दलची आभार मानणारी एक पोस्ट रिषभने इंस्टाग्रामवरून केली.

रिषभने केली इंस्टाग्राम पोस्ट
कोरोनावर मात केल्यानंतर रिषभचे गुरुवारी (२२ जुलै) पुन्हा एकदा भारतीय संघात आगमन झाले. त्यावेळी संपूर्ण भारतीय संघाने त्याचे स्वागत केले. याबाबत रिषभने इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे पोस्ट केली. ज्यामध्ये रिषभने फुलांचा हार घातलेला दिसत आहे. एका छायाचित्रात तो मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत तर, दुसऱ्या छायाचित्रात आपले संघसहकारी उमेश यादव, मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूर यांच्यासोबत दिसतोय.

या पोस्टला कॅप्शन देताना रिषभने लिहीले, ‘हार के बाद जीत है और जितने वाले को कहते है बाजीगर. संघात परतून आनंद झाला. या मोठ्या स्वागतासाठी रवी सरांचे आभार.’ चाहत्यांची या पोस्टला चांगलीच पसंती मिळत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता रिषभ
तेवीस वर्षीय रिषभ पंत काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला १३ जुलैपर्यंत पर्यटनास परवानगी देण्यात आलेली. या काळात रिषभने युरो कप २०२० च्या काही सामन्यांना हजेरी लावलेली. त्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झालेले. त्याच्या व्यतिरिक्त संघाचे थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गिरानी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्या संपर्कात आलेले अभिमन्यू ईस्वरन, वृद्धिमान साहा व गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे देखील क्वारंटाईन आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

रवी शास्त्री यांच्याऐवजी द्रविडकडे द्यायला हवे का भारताचे प्रशिक्षकपद? माजी क्रिकेटरने दिले ‘हे’ उत्तर

‘गोलंदाजी करताना तो लयीत दिसत नाही’, हार्दिकच्या तंदुरुस्तीवर माजी भारतीय क्रिकेटरने उपस्थितीत केले प्रश्न

उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाच्या तयारीसाठी ‘हे’ दोन संघ युएईत लवकर पोहचण्यास सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---