भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉकच्या मैदानावरील सामन्याने सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या या मालिकेत एकूण चार कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच चेन्नईत दाखल झाला होता.
मात्र, चेन्नईत आल्यावर कोरोना विषाणूच्या नव्या नियमावलीनुसार क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे आवश्यक होते. त्यामुळे गेले सहा दिवस हे खेळाडू सराव न करता चेन्नईच्या लीला पॅलेस या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी (१ फेब्रुवारी) हा कालावधी पूर्ण झाल्याने खेळाडूंची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आज (२ फेब्रुवारी) त्यांचा सरावाचा पहिला दिवस आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारतीय खेळाडूंचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कर्णधार विराटसह इतर भारतीय खेळाडू सरावासाठी जमा झाले असल्याचे दिसत आहे. सोबतच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री इतर प्रशिक्षकांसह खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसत आहेत.
बीसीसीआयने या फोटोंना कॅप्शन देत लिहिले आहे की, ‘भारतीय संघाचा सरात्र सत्रातील पहिला दिवस आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सर्व खेळाडूंचे जोरदार स्वागत केले आहे. ‘
Day 1 of our nets session in Chennai and it is Head Coach @RaviShastriOfc who welcomes the group with a rousing address. #TeamIndia #INDvsENG pic.twitter.com/eueKznxrMa
— BCCI (@BCCI) February 2, 2021
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टिकण्यासाठी भारताला घ्यावी लागणार मेहनत
भारतीय संघासाठी ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. भारताला लॉर्डस येथे होणाऱ्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असल्यास इंग्लंड विरुद्ध दोन विजयांच्या फरकाने मालिका जिंकणे आवश्यक आहे. मात्र जर भारतीय संघ ३-० अथवा ४-० ने पराभूत झाला; तर भारतीय संघाच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या आशा धुळीस मिळतील. इंग्लंडला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ३-० ने विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे ही मालिका अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
लवकरच भिडणार भारत आणि इंग्लंड संघ
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार आहे. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविडचा तो एक कॉल अन् रहाणेला सापडली कांगारूंना पराभूत करण्याची किल्ली
विरुष्काच्या लेकीचं नाव आहे खूप खास, जाणून घ्या ‘वामिका’ या नावाचा अर्थ
दे घुमा के! बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी करतेय धडाकेबाज फलंदाजी, एकदा व्हिडिओ पाहाच