---Advertisement---

रो-हिट मॅन शो इज ऑन..! इंग्लिश गोलंदाजांना चोप-चोप चोपलं, रोहितचं शानदार शतक; पाहा सेलिब्रेशन

---Advertisement---

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मोठ्या आकडी धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. यात सलामीवीर रोहित शर्माचा मोठे योगदान आहे. हा विस्फोटक फलंदाज डावाच्या सुरुवातीपासून मैदानावर टिकून असून त्याने झुंजार शतकी खेळी केली आहे. सोशल मीडियावर त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

भारताकडून डावाची सुरुवात करताना पहिल्याच षटकापासून रोहितने जबरदस्त फटकेबाजी केली. आपला आक्रमक फॉर्म कायम राखत त्याने अवघ्या ४७ चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावले. त्यानंतर पाहता पाहता १३० चेंडूत नाबाद १०० धावाही चोपल्या. यादरम्यान ८५ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने २ षटकार आणि १४ चौकार मारले. हे रोहितचे कसोटी कारकिर्दीतील सातवे आणि चेन्नईतील पहिलेच शतक ठरले आहे.

जवळपास एका वर्षानंतर प्रेक्षकांनी गजबजलेल्या स्टेडियममध्ये शतक करण्याची विक्रमी कामगिरी केल्यानंतर रोहितने शावदार सेलिब्रेशनही केले. हवेत बॅट उंचावत त्याने आनंद व्यक्त केला. यावेळी कर्णधार विराट कोहली, पत्नी रितीका सजदेहबरोबरच प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले. तसेच रोहितसोबत मैदानावर फलंदाजी करत असलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही मिठी मारत त्याची पाठ थोपटली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने या लक्षणीय क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनीही या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

रोहित ठरला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा चौथा भारतीय
विशेष म्हणजे, चेन्नई कसोटीतील हे शतक रोहितचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तब्बल ४० वे शतक ठरले आहे. यासह तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करमारा चौथा खेळाडू ठरला आहे. याबाबतील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अव्वलस्थानी विराजमान आहे. त्याने सर्वाधिक १०० शतके केली आहेत. सचिननंतर ७० शतकांसह विराट कोहलीचा दुसरा क्रमांक लागतो. तर द वॉल राहुल द्रविड ४८ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG 2nd Test Live: हिटमॅन रोहित शर्माचे धमाकेदार शतक; ४१ ओव्हरनंतर भारताच्या ३ बाद १४४ धावा

मोईन अलीच्या जबरदस्त चेंडूने स्टंप्सचा भुगा, स्वत: विराट कोहलीही अवाक्; पाहा भन्नाट व्हिडिओ

फॉर्मवर प्रश्न उपस्थित केल्याने पत्रकारांवर भडकला रहाणे; म्हणाला, “जाऊन माझ्या मागील १५ सामन्यांचे…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---