---Advertisement---

क्रिकेट ब्रेकिंग! बीसीसीआयकडून भारत-श्रीलंका मालिकेच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब; पाहा नवे टाईमटेबल

On: शनिवार, जुलै 10, 2021 3:50 PM
---Advertisement---

भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. तत्पुर्वी यजमान श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही मालिका पुढे ढकलली जाणार असल्याची चर्चा आहे. अशात शनिवारी (१० जुलै) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेची सुरुवात १८ जुलै रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केली आहे. तर २९ जुलै रोजी तिसऱ्या व शेवटच्या टी२० सामन्याने हा दौरा संपन्न होणार आहे.

इंग्लंड दौऱ्यावरुन आल्यानंतर श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर आणि डेटा ऍनॅलिस्ट कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे मालिका काही दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन श्रीलंकेचे सर्व खेळाडू त्यांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करू शकतील आणि इतरांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होईल.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंबंधी माहिती देताना म्हटले की, आम्ही समजू शकतो की, सध्याची परिस्थिती खूप कठीण आहे. पण या कठीण काळात आगामी भारत-श्रीलंका मालिका सुरळितपणे पार पाडण्यासाठी बीसीसीआय श्रीलंका क्रिकेटला पूरेपुर सहयोग करेल. आमची मेडिकल टीम श्रीलंका संघाच्या डॉक्टरांशी संपर्कात आहे. त्यांच्या संमतीने खेळाडूंच्या सुरक्षेकरिता ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ऍशले डी सिल्वा म्हणाले की, “या कठीण परिस्थितीत बीसीसीआयने आम्हाला समजून घेतले आणि आमच्या निर्णयांना संमती दिल्याने आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.”

असे आहे नवे वेळापत्रक

वनडे मालिका –
१८ जुलै – पहिला वनडे सामना, कोलंबो
२० जुलै – दुसरा वनडे सामना, कोलंबो
२३ जुलै – तिसरा वनडे सामना, कोलंबो

टी२० मालिका –
२५ जुलै – पहिला टी२० सामना, कोलंबो
२७ जुलै – दुसरा टी२० सामना, कोलंबो
२९ जुलै – तिसरा टी२० सामना, कोलंबो

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग दुसऱ्यांदा बनला बाबा, झाली पुत्ररत्न प्राप्ती

‘अरे इतके तर मुलेसुद्धा डीपी बदलत नाहीत,’ सतत कर्णधार बदलल्याने जाफरने श्रीलंकाची केली थट्टा

पाकिस्तानची पुन्हा फजिती, ‘या’ कारणामुळे वेगवान गोलंदाजाची इंग्लंडहून झाली हकालपट्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---