Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीसीसीआयने सोडवली देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंची सर्वात मोठी समस्या! आता राज्य संघटना…

November 21, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy;Twitter/BCCI Domestic

Photo Courtesy;Twitter/BCCI Domestic


जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये सध्या अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. नवे बीसीसीआय अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांची निवड झाल्यानंतर आता खेळाडूंच्या वेतनाबाबत देखील मोठा निर्णय घेतला गेला आहे.

बीसीसीआय सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंना त्यांच्या वरिष्ठतेनुसार वेतन देते. ही रक्कम हजारांपासून लाखांपर्यंत आहे. मात्र, अनेकदा खेळाडूंना ही रक्कम मिळण्यासाठी मोठी दिरंगाई होते. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खेळाडूंना आपल्या राज्य संघटनेच्या कार्यालयाचे खेटे मारावे लागतात. यामुळे खेळाडूंना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. खेळाडूंचा हाच त्रास कमी करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ऑनलाइन डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम (ODMS) या प्रणालीचा शुभारंभ केला. यामुळे खेळाडू बसल्या जागी आपल्या वेतनाची मागणी ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. यामुळे खेळाडूंचा बराचसा वेळ वाचणार असून, भ्रष्टाचार देखील कमी होणार आहे. यासोबतच राज्य संघटना देखील बीसीसीआयकडे‌ अशाच पद्धतीने आपल्या निधीची मागणी करू शकतात. काही दिवसापूर्वीच बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूं इतकीच मॅच फीस देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

सध्या बीसीसीआय 40 प्रथमश्रेणी सामने खेळलेल्या देशांतर्गत खेळाडूंना प्रत्येक सामन्याचे 60 हजार रुपये मिळतात. तर, 23 वर्षाखालील खेळाडूंना एका सामन्याचे प्रत्येकी 25 हजार तर 19 वर्षाखालील संघाच्या खेळाडूंना 20 हजार रुपये मिळतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख, वनडे सामन्यासाठी 6 लाख व टी20 सामन्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये मिळतात.

(BCCI Starts ODMS System For Domestic Cricketers Payment)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतची जागा घेण्यासाठी सज्ज झाला ‘हा’ यष्टीरक्षक, सलग 5 शतकांचा पाऊस पाडत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर निवृत्त, भावनेच्या भरात केलेलं वक्तव्य वेधतंय लक्ष 


Next Post
N-Jagadeesan

स्वत:साठी नाही, तर संघासाठी! धावा कुटण्याच्या नादात विक्रम मोडलाय हेच विसरून गेलेला जगदीशन, म्हणाला...

West Indies

पूरनची हकालपट्टी? वेस्ट इंडीजला मिळणार नवा कर्णधार; आयपीएल गाजवलेल्या खेळाडूला मिळू शकते जबाबदारी

Wasim-Akram

'भारतीय म्हणतात दिग्गज, पण आपलेच काढतात इज्जत', पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे दु:ख आले बाहेर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143