आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) स्वप्न भंग होण्याची शक्यता सुरू झाली आहे. अहमदाबादची फ्रँचायझी घेतलेल्या सीव्हीसी कॅपिटल या कंपनीमूळे ही वेळ येऊ शकते. या कंपनीच्या बेटिंग लिंक समोर आल्या असून, यावरून वाद निर्माण झाला आहे.
बीसीसीआयने सीव्हीसी कॅपिटलचे प्रकरण भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे पाठवले असल्याचे वृत्त आहे. मेहता हे बीसीसीआयचेही वकील आहेत. सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद फ्रँचायझी ५६२५ कोटी रुपयांना विकत घेतली होती. परंतु अद्यापपर्यंत बीसीसीआयच्या करार पत्रावर त्यांच्यावतीने स्वाक्षरी करण्यात आलेली नाही. सीव्हीसी कॅपिटल ही अमेरिकन कंपनी असून, तिची ब्रिटनमध्ये बेटिंग फर्म आहे. मात्र, हे काम बेकायदेशीर नसल्याचे सीव्हीसीकडून सांगण्यात येतेय.
ललित मोदी करतायेत विरोध
आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी हे सीव्हीसी कॅपिटलला फ्रँचायझी देण्यास सातत्याने विरोध करत आहेत. याप्रकरणी ते सातत्याने बीसीसीआयला घेरताना दिसून येतायेत. एका प्रमुख क्रीडासंकेतस्थळाच्या वृत्तानुसार, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बीसीसीआयला सीव्हीसीबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. मात्र, त्याचवेळी प्रत्येक बाजू पडताळून पाहण्यास सांगितले आहे. अनेक कायदेशीर सल्लागार या कामात गुंतल्याचे या प्रकरणाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे. लवकरच तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असेल.
लखनौ फ्रँचायझीही वादात
पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादसारख्या संघांनी दुसरा नवा संघ लखनौ फ्रँचायझीबाबत बीसीसीआयकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे. या संघांचा आरोप आहे की, लखनौचे मालक त्यांच्या खेळाडूंशी संपर्क साधत आहेत. तसेच त्यांना आपल्या संघात सामील होण्यासाठी आमिष दाखवतायेत. या अंतर्गत केएल राहुल आणि राशिद खान यांना लखनौने मोठ्या रकमेचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात हे दोघे क्रिकेटपटू दोषी आढळल्यास त्यांच्यावर एक वर्षाचे निलंबन होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला नुकसान; पाकिस्तान होऊ शकतो वरचढ
‘टीम इंडिया’ कानपूरमधून मुंबईला घेऊन जाणार चार ‘सकारात्मक’ गोष्टी
द्रविड यांनी दाखवले हिमालयाएवढे दातृत्व! मैदान कर्मचाऱ्यांना केली ‘अशा’ प्रकारची मदत