---Advertisement---

बांगलादेशची बंडखोरी महागात! BCCI ने उचललं मोठं पाऊल, भारत दौरा रद्द

On: रविवार, जानेवारी 25, 2026 4:45 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतात येण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) नकार दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने बांगलादेशला थेट स्पर्धेतून बाहेर काढले आहे. बीसीबीच्या या भूमिकेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील नाराज असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बोर्डांमधील संबंध आता तणावपूर्ण अवस्थेत आहेत.

आयसीसीच्या निर्णयानंतर बीसीसीआयनेही बांगलादेशविरोधात कठोर पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा बांगलादेश दौरा रद्द करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. आधी ऑगस्ट 2025 मध्ये होणार होता हा दौरा, ज्यात टी-20 आणि वनडे मालिका खेळवण्यात येणार होत्या. सुरक्षेच्या कारणांमुळे तो सप्टेंबर 2026 पर्यंत ढकलण्यात आला होता, मात्र आता दोन्ही बोर्डांमधील तणावामुळे या दौऱ्याचे आयोजन होणे शक्य नाहीसे दिसत आहे.

जर बीसीसीआयने दौरा रद्द केला, तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. भारताविरुद्ध मालिका रद्द झाल्यास कोट्यवधींचा नुकसान सहन करावा लागेल. आयसीसीदेखील बांगलादेशविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय BCBसाठी घातक ठरू शकतो, कारण निधी मिळणे थांबले तर देशात क्रिकेटचे नियोजन चालवणेही कठीण होईल.

सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशची जागा स्कॉटलंडने घेतली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, स्कॉटलंड आता बांगलादेशच्या जागी क ग्रुपमध्ये खेळेल. स्कॉटलंडचे तीन सामने कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये, तर एक सामना मुंबईत नेपाळविरुद्ध होईल. कोलकाता येथे त्यांना वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंड विरुद्ध खेळावे लागणार आहे.

आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला निर्णय बदलण्यासाठी 24 तासांचा अवधी दिला होता. मात्र बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे बीसीबीने भारतात सामने न खेळण्याची घोषणा केली. यामुळे भारत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम दिसून येत असून, टी-20 वर्ल्ड कप 2026च्या तयारीत स्कॉटलंडसारख्या नवख्या संघाला संधी मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---