टीम इंडिया सध्या सातत्याने आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे. संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. दरम्यान, बीसीसीआयने शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. त्यानंतर आता या आठवड्यात बीसीसीआय आगामी टी-२० विश्वचषक आणि आशिया चषकासाठी संध जाहिर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
क्रिकबझच्या बातमीनुसार, २७ ऑगस्टपासून टी-२० आशिया कपला सुरुवात होणार आहे. त्यासाठी संघाची नावे आठ ऑगस्टपर्यंत पाठवायची आहेत. आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेला १५ सदस्यीय संघच टी-२० विश्वचषक स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे. म्हणजेच येत्या आठवडाभरात विश्वचषकासाठी संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. हे खेळाडू आशिया कपमधील ५ सामने आणि ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ६ टी-२० सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहेत. म्हणजेच विश्वचषकापूर्वी त्यांना किमान १० सामने खेळायला मिळणार आहेत.
केएल राहुल परतण्याच्या तयारीत आहे
विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल टी-२० आशिया चषकासाठी पुनरागमन करणार आहेत. तिघेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाहेर आहेत. आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहितने अर्धशतक झळकावले. २०२२च्या आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. अशा स्थितीत उरलेल्या ४ सामन्यांमध्ये त्याला आपली लय कायम ठेवायला आवडेल.
दिनेश कार्तिकने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टी-२० विश्वचषकासाठी आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. रिषभ पंतला संघात बसवण्यासाठी व्यवस्थापनाने त्याला सलामीवीर म्हणूनही आजमावले आहे. विराट कोहली आणि केएल राहुलच्या पुनरागमनामुळे दीपक हुडा, श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान कसे मिळवता येईल, ही निवड समितीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
शिवाय, नुकत्याच जाहिर झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात संघाला ३ वनडे सामने खेळायचे आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन येथेही संघाचे नेतृत्व करेल. केएल राहुल अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. अशा स्थितीत त्याला पुन्हा एकदा संघात स्थान मिळू शकले नाही. त्याचवेळी दुखापतीतून सावरणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर झिम्बाब्वे दौऱ्यातून पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या मागे संघनिवडीसाठी अधिक पर्याय उपलब्ध झाल्येने डोकेदुखी वाढल्याचेही चिन्हे दिसत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारत पाकिस्तान एजबॅस्टन वर भिडणार, आपण मात्र ‘या’ ठिकाणी सामना पाहणार!
पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज, असा आहे रेकॉर्ड
अर्शदीपने सांगितले आपल्या यशाचे गमक; ‘त्या’ दोन व्यक्तींबाबत बोलला मन जिंकणारी गोष्ट