रविवारी (12 जानेवारी) भारतीय नियामक मंडळाची (BCCI) विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत, बीसीसीआयच्या राज्य युनिट्सकडून नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांचा सन्मान केला जाईल. जय शाह यांनी (1 डिसेंबर) रोजी आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सप्टेंबर महिन्यात जय शाह यांची बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान जय शाह आयसीसीचे सर्वात तरूण अध्यक्ष बनले. ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांची जागा बीसीसीआयचे माजी सचिव यांनी घेतली.
यापूर्वी, जय शाह (Jay Shah) (ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2021) पर्यंत बीसीसीआयचे सचिव होते. बीसीसीआयच्या सचिवपदानंतर त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे पदभार स्वीकारला. मात्र, आता जय शाह यांना बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. या विशेष सर्वसाधारण सभेत राज्य युनिट्सकडून जय शाह यांचा सन्मान केला जाईल.
खरे तर, जय शाह यांनी क्रिकेट प्रशासक म्हणून जागतिक स्तरावर खेळाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, असे मानले जाते. अलीकडेच जय शाह यांनी ब्रिस्बेन ऑलिम्पिक आयोजन समितीच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेऊन उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करावा अशी मागणी केली होती.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे, जवळजवळ 128 वर्षांनंतर, क्रिकेट ऑलिम्पिक खेळांचा एक भाग बनला आहे. तथापि, 2032च्या ब्रिस्बेन ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा पुन्हा समावेश करण्यात जय शाह यांनी मोठी भूमिका बजावली आहे, असे मानले जाते.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र द एजनुसार, जय शाह क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माइक बेयर्ड आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिचर्ड शोम्पाथन यांची भेट घेतील. यादरम्यान ते द्विस्तरीय कसोटी प्रणालीवर चर्चा करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शाब्बास स्मृती! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला नवा विक्रम, दिग्गज मिताली राजला टाकले मागे
आधी बॅट तुटली, नंतर डोक्यावर आदळली! डेव्हिड वॉर्नरसोबत घडली विचित्र घटना; VIDEO व्हायरल
शुबमन गिलकडे वनडेत मोठा विक्रम रचण्याची संधी, ही कामगिरी करणारा बनेल पहिलाच खेळाडू