भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी जाहिरात जारी करणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ यावर्षी जून महिन्यात संपणार आहे. म्हणजे याचा अर्थ की, बीसीसीआय त्यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या विचारात नाही. मात्र जय शाह यांनी म्हटलं आहे की, राहुल द्रविड पुन्हा या पदासाठी अर्ज करू शकतात. एवढेच नाही तर, जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे की, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक विदेशी देखील असू शकतो. तसेच टीम इंडियाचा फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग कोच कोण असेल, हे मुख्य प्रशिक्षकाची चर्चा करून ठरवलं जाईल.
जय शाह ‘क्रिकबझ’शी बोलताना म्हणाले, “राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जूनपर्यंत आहे. ते पुन्हा अर्ज करण्यासाठी स्वतंत्र आहेत. आम्ही आत्ताच सांगू शकत नाही की, मुख्य प्रशिक्षक भारतीय असेल की विदेशी.” बीसीसीआयनं सूचित केलं आहे की, सध्या वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा कोच नियुक्त करण्याचा कुठलाही विचार नाही. इंग्लंड आणि पाकिस्तानच्या बोर्डानं असं केलं आहे.
वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कोचबाबत जय शाह म्हणाले की, “यावर सीएसी निर्णय घेईल. भारतात विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत असे सर्व फॉरमॅट खेळणारे खेळाडू आहेत. भारतात अशी परिस्थिती नाही.” जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे की, नव्या मुख्य प्रशिक्षकांचा पहिला कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.
राहुल द्रविड यांना नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. त्यानंतर 2023 च्या विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. मात्र, त्यानंतर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियानं शानदार कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात भारतानं 2023 विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
महत्त्वाच्या बातम्या –