---Advertisement---

पर्पल-हर्षल ! आरसीबीच्या स्वप्नांना सुरुंग लावत हर्षल पटेलने पुन्हा खेचून आणली पर्पल कॅप, खास रेकॉर्डही बनवला

Harshal Patel IPL
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमधील 58वा सामना गुरुवारी (दि. 9 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील हा सामना अत्यंत महत्वाचा होता. या सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाबने गोलंदाजी स्विकारली आणि बंगळुरु टीम आधी फलंदाजीसाठी आली. यावेळी आरसीबीच्या फलंदाजांनी धुवांधार फलंदाजी करत संघाची धावसंख्या 241 वर नेली.

बंगळुरुच्या या 241 धावांत विराट कोहली (92) आणि रजत पाटीदार (55) यांचे वादळी अर्धशतक आणि कॅमरून ग्रीनच्या तडाखेबाज फलंदाजीचा समावेश होता. बंगळुरुच्या टीमची लय पाहता हा संघ 250+ जाईल असे सर्वांना वाटत होते. परंतू आरसीबीच्या या स्वप्नांची धुळधाण हर्षल पटेलने केली आणि तेही सामन्याच्या अखेरच्या षटकात. अखेरचे षटक टाकायला आलेल्या हर्षल पटेलने अवघ्या 3 धावा देत 3 बळी घेतले, यासह त्याने आरसीबीचा धावफलक 241 धावांवरच रोखला. ( PBKS vs RCB Most Wickets In IPL 2024 Purple Cap Holder Harshal Patel )

अखेरच्या षटकातील 3 विकेट्ससह हर्षल पटेलने पुन्हा यंदाच्या मोसमातील पर्पल कॅप पटकावली. सोबतच आयपीएल 2024 मध्ये 20+ विकेट्स घेणारा हर्षल पहिला खेळाडू ठरला आहे. महत्वाचे म्हणजे हर्षलने याच सामन्यात आणखीन एक खास रेकॉर्ड केला आहे, तो म्हणजे आयपीएलमध्ये अखेरच्या म्हणजे 20व्या षटकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत हर्षल आता 31 बळींसह दुसऱ्या स्थानी आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---