---Advertisement---

बीसीसीआयच्या कारवाईचे सत्र सुरूच, आणखी एका महत्वाच्या व्यक्तीची हकालपट्टी

Team India
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022मध्ये भारताच्या खराब प्रदर्शनानंतर बीसीसीआयने एकानंतर एक मोठे निर्णय घेतले. पूर्ण निवड समिती बरखास्त केल्यानंतर बीसीसीआयने आणखी एक नवा निर्णय घेतला. माध्यम संस्थांच्या अहवालानुसार बीसीसीआयने भारतीय संघाचे मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला.

पॅडी अप्टन (Paddy Upton) यांना प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या विनंतीवरुन टी20 विश्वचषक लक्षात ठेवून जुलैमध्ये संघाशी जोडण्यात आले होते. अप्टन जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाशी जोडले गेेले होते आणि टी20 विश्वचषकानंतर त्यांचा करार संपला होता. आता अशा बातम्या समोर येत आहेत की रोहित शर्माच्य नेतृत्वाखाली खेळल्या जाणाऱ्या बांगलादेश दौऱ्यावर संघासोबत नसणार आहेत. या दौऱ्यावर भारताला 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, बीसीसीयने मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांचा करार पुढे चालू न ठेवण्याचा निर्णय घेतला. अप्टन यांना खेळाडूंना तणावातून कसे यावे याच्या क्लृप्त्या शिकवण्यासाठी संघाशी जोडले गेले होते. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला होता. त्यांनी आशिया चषकाच्या आधी कोहलीसोबत बराच वेळ घालवला आणि त्याला फॉर्ममध्ये येण्यात मदत केली.

याशिवाय त्यांनी टी20 विश्वचषक सुरु असताना केएल राहुल (KL Rahul) याला देखील मार्गदर्शन केले. याचा परिणाम असा बघायला मिळाला की सुरुवातीच्या सामन्यात अयशस्वी राहिलेल्या राहुलने झिम्बाब्वे आणि बांगलादेश विरुद्ध अर्धशतक लगावले होते. या सामन्यात भारत विजय मिळवण्यात यशस्वी झाला होता.

अप्टनच्या आधी, बीसीसीआयने चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या निवड समितीला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला. अप्टन भारतीय संघासोबत आतापर्यंत तीनवेळा जोडले गेले. मात्र, त्यांचा भारतीय संघासोबतचा प्रवास वाईट पद्धतीने संपला. कारण, भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेच्या बाद फेरीतून बाहेर पडला. याआधी ते 2011मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघासोबत होते. तेव्हा त्यांनी गॅरी कर्स्टन यांच्यासोबत मिळून भारताला विश्वविजेता बनवण्यात महत्वाची भुमिका साकारली होती. (BCCI took stringent action against mental conditioning coach by not renewing his contract)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जम्मू-काश्मीरचा जबरदस्त विक्रम! देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी
वॉर्नरला मिळाला ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा पाठिंबा! म्हणाला, ‘त्याने किंमत चुकवलीय आता…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---