इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलची गणना जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित टी20 लीगमध्ये होते. या लीगचे 15 हंगाम पार पडले आहे. आता आगामी 16वा हंगाम असणार आहे. या हंगामापूर्वी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. यामध्ये असे म्हटले जात आहे की, आयपीएलच्या काही फ्रँचायझी परदेशातील टी20 लीगमध्ये उतरल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय कथितरीत्या नाखुश आहे.
अनेक फ्रँचायझींनी परदेशातील टी२० लीगमध्ये सक्रिय भागीदारी केली आहे. सध्या तीन फ्रँचायझी कॅरिबियन प्रीमिअर लीगमध्ये आहेत. तसेच, आगामी आंतरराष्ट्रीय लीग टी20मध्ये एक संघ आयपीएलशी संबंधित आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेत जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एसए20मधील सर्व 6 संघ आयपीएल संघांच्या मालकांचेच आहेत.
हाती आलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने फ्रँचायझी मालकांना परदेशातील लीगमधील भागीदारीवर नाराजी व्यक्त केली आहे. कारण, बीसीसीआयला अशी भीती आहे की, यामुळे त्यांच्या लीगचे मूल्य कमी होऊ शकते. कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव होण्यापूर्वी एक बैठक झाली. त्यामध्ये एका संघाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, “तो मीटिंगमधील मुद्दा होता. त्यांनी (बीसीसीआय) फ्रँचायझी मालकांना परदेशातील लीगमध्ये भाग घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, जे आधीपासून तिथे आहेत, त्यांना त्यांचे समजले. मात्र, त्यांनी आम्हाला भविष्यात अशाप्रकारचे पाऊल उचलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. ते सल्ला देत होते की, परदेशातील लीगमधील आपली उपस्थिती ही आयपीएलचे मूल्य कमी करू शकते.”
या बैठकीत बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) आणि नवनियुक्त आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) हेदेखील उपस्थित होते. आयपीएलचे अध्यक्ष धुमाळ म्हणाले की, “आम्ही त्यांना रोखू शकत नाही. त्यांच्याकडे पैसा आहे, त्यामुळे ही त्यांची आवड आहे.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, “बीसीसीआयकडे फ्रँचायझींच्या परदेशातील भागीदारीवर बंदी आणण्यासाठी कोणतीही पॉवर नाहीये.” त्यांचे असे मत आहे की, “त्यांनी कोणत्याही लीगमध्ये जावो, पण हेदेखील खरे आहे की, आयपीएल ही सर्व लीगपेक्षा वेगळी आणि खूप मोठी आहे.”
आयपीएलचा 2023चा मिनी लिलाव
आयपीएल 2023चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) पार पडला. यामध्ये 5 परदेशी खेळाडूंवर सर्वात जास्त कोटी रुपयांचा पाऊस पडला. सॅम करनला दिल्ली कॅपिटल्सने 18.50 कोटी, कॅमरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी, बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी, निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटी आणि हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने 13.25 कोटीत आपल्या संघात घेतले. आयपीएलचा 16वा हंगाम पुढील वर्षी खेळला जाईल. यामध्ये हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (bcci unhappy with ipl franchises investment in overseas t20 leagues read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू, पण चर्चा फक्त त्याच्या गर्लफ्रेंडचीच; लव्हलाईफबद्दल वाचाच
लिलावात सर्वाधिक रक्कम घेऊन उतरलेल्या हैद्राबादने ‘या’ तिघांवरच उधळले 26 कोटी, पाहा संपूर्ण संघ