इंडियन प्रीमियर लीग ही जगभरातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. ही लीग सुरू झाल्यापासून, बीसीसीआयने प्रत्येक हंगामात कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. कोरोनाच्या काळात अनेक बोर्ड आपल्या खेळाडूंच्या मानधनाला कात्री लावत होते. परंतु बीसीसीआयने असे काहीच केले नाही. आयपीएलच्या आगामी हंगामात तर बीसीसीआय जोरदार कमाई करणार आहे.
आतापर्यंत आयपीएलमध्ये ८ संघ विजय मिळवण्यासाठी धडपड करायचे. परंतु येत्या आयपीएल २०२२ मध्ये संघांची संख्या १० होणार आहे. क्रिकबजच्या एका वृत्तानुसार, येणाऱ्या नवीन संघाची किंमत १८०० कोटी इतकी असणार आहे. तसेच लिलावात बोली लागता लागता ही किंमत २२०० ते २९०० कोटींपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच दोन नवीन संघाच्या येण्याने बीसीसीआयवर पैशांचा पाऊस पडेल यात काही शंका नाही.
आयपीएल स्पर्धेत ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची मूळ किंमत २७०० ते २८०० कोटी इतकी आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाची मूळ किंमत २२०० ते २३०० कोटी इतकी आहे. यासोबतच राजस्थान रॉयल्स संघाची मूळ किंमत १८५५ कोटी रुपये आहे.(Bcci planning to add two more teams in Ipl 2022)
केव्हा होणार आयपीएलच्या नव्या संघांचा लिलाव?
माध्यमातील वृत्तानुसार, येत्या जुलै महिन्यात दोन संघांसाठी लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआय हे लवकर घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, ते दोन संघ कुठले असतील? असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, दोन संघांपैकी पहिला संघ अहमदाबाद येथील असू शकतो. कारण अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बनवण्यात आले आहे. त्यामुळे अहमदाबाद संघ आयपीएल २०२२ स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो.
तसेच दुसऱ्या संघाबद्दल बोलायचं झालं तर, तो संघ युपी अर्थात उत्तर प्रदेशचा असू शकतो. तसेच लखनऊ देखील यासाठी लिलावासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण लखनऊ मध्ये देखील नवीन स्टेडियमची निर्मिती करण्यात आली आहे. या स्टेडियममध्ये काही सामनेही खेळवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजापुढे श्रीलंका फेल, पावरप्लेत ४ निर्धाव षटके टाकत केला ‘खास विक्रम’
इंग्लंडमध्ये घोंगावलं जो रूटचं वादळ, अर्धशतक झळकावत ‘या’ विक्रमांत केली रिचर्ड्सची बरोबरी
बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या गैरवर्तनामुळे ‘या’ नामवंत पंचांचे मोठे पाऊल, सोडली पंचगिरी