---Advertisement---

इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजापुढे श्रीलंका फेल, पावरप्लेत ४ निर्धाव षटके टाकत केला ‘खास विक्रम’

On: बुधवार, जून 30, 2021 9:01 AM
---Advertisement---

श्रीलंकन संघाला टी-२० क्रिकेटमध्ये ३-० ने पराभूत केल्यानंतर, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू ख्रिस वोक्स याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ख्रिस वोक्स याने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने पावरप्लेच्या षटकांमध्ये ४ निर्धाव षटके टाकली. यासोबतच तो स्टुअर्ट ब्रॉडनंतर पावरप्लेमध्ये ४ निर्धाव षटके टाकणारा पहिला इंग्लिश गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी स्टुअर्ट ब्रॉडने २००८ मध्ये हा कारनामा न्यूझीलंड संघाविरुद्ध केला होता. वोक्सने पावरप्लेमध्ये ५ षटक गोलंदाजी केली, यातील ४ षटके निर्धाव होती. (Chris woakes is the second England bowler to bowl four maidens in mens odi)

याच सामन्यात ख्रिस वोक्सने पथुम निसांकाला बाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे. त्याने पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर निसांकाला बाद करत हा मोठा पराक्रम केला आहे. यासोबतच त्याने दिग्गज इंग्लिश गोलंदाज जेम्स अँडरसनला देखील मागे सोडले आहे. जेम्स अँडरसनने हा कारनामा ११५ व्या वनडे सामन्यात केला होता. तर ख्रिस वोक्सने हा कारनामा १०५ वनडे सामन्यात केला आहे. इंग्लंड संघाकडून सर्वात जलद १५० गडी बाद करण्याचा विक्रम स्टुअर्ट ब्रॉडच्या नावे आहे.

https://twitter.com/aslaameyyy/status/1409844100073885702?s=20

पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकन संघाला प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १८५ धावा करण्यात यश आले होते. हे लक्ष्य इंग्लंड संघाने ९१ चेंडू आणि ५ गडी शिल्लक असतानाच पूर्ण केले होते. इंग्लंड संघाकडून ख्रिस वोक्सने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने १० षटक गोलंदाजी करत ४ श्रीलंकन फलंदाजांना माघारी धाडले. यामध्ये ५ षटके निर्धाव होती.

महत्वाच्या बातम्या-

बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या वाईट वर्तनामुळे ‘या’ नामवंत पंचांचे मोठे पाऊल, सोडली पंचगिरी

इंग्लंड वि श्रीलंका: पहिल्या वनडेत श्रीलंकेची नामुष्कीजनक हार, ख्रिस वोक्सची भेदक गोलंदाजी

‘या’ कारणामुळे धोनीला मिळाला नाही निरोपाचा सामना, माजी निवडकर्त्यांनी केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---