एक महत्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी मोठा निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात लवकरच वाढ होऊ शकते.
एका क्रीडा वृत्त वाहिनीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करू शकते. त्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्याची जबाबदारी अजित आगरकर यांच्या निवड समितीकडे सोपविण्यात आली आहे. माहितीनुसार, देशांतर्गत क्रिकेटपटूंची फी किमान दुप्पट असावी, असे बीसीसीआयचे मत आहे. यामध्ये 10 रणजी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना बोर्ड 75 लाख ते 1 कोटी रुपये वार्षिक मानधन देऊ शकते. ( Bcci Will Soon Increase Salary Of Domestic Cricketers And They Will Get Higher Salary )
बीसीसीआय कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत वर्षभरात 75 टक्के पेक्षा जास्त कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये 300 टक्के वाढ होईल. त्याचवेळी बीसीसीआयने नुकतेच केंद्रीय करारात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना आणत आहे. सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवाच्या आधारे वेतन दिले जाते.