संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा उर्वरित हंगाम खेळला जात आहे. आतापर्यंत या हंगामाच्या साखळी फेरीतील ४२ सामने पार पडले आहेत. साखळी फेरीतील अजून १४ सामने शिल्लक असून ८ ऑक्टोबर रोजी शेवटचा सामना होईल. त्यानंतर प्लेऑफमधील सामन्यांस सुरुवात होईल. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वेळापत्रकात थोडा बदल केला आहे. २ ऑक्टोबर रोजी होणारे शेवटचे २ साखळी फेरी सामने एकाच वेळी घेणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. मंगळवारी (२८ सप्टेंबर) त्यांनी यासंबंधी घोषणा केली आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात वेळापत्रकातील बदलाव्यतिरिक्त आगामी आयपीएल २०२२ मध्ये सहभागी होणाऱ्या नव्या संघांच्या नावांची घोषणा करण्याची तारिखही सांगितली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी होणारे आयपीएल २०२१ च्या साखळी फेरीतील शेवटचे २ सामने एकाच वेळी म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळले जातील. यापूर्वी यादिवशी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता अंतिम डबल हेडरमधील पहिला सामना होणार होता. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दुबई येथे संध्याकाळी ७.३० वाजता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडणार होता. मात्र आता हे दोन्हीही सामने ठरलेल्या ठिकाणीच संध्याकाळी ७.३० वाजता खेळले जातील.
🚨 NEWS 🚨: BCCI announces Tender of IPL Media Rights for 2023-2027 cycle
More Details 🔽https://t.co/AVUYyIQaZ2 pic.twitter.com/mosCNzmyGo
— BCCI (@BCCI) September 28, 2021
नव्या आयपीएल संघांची नावे या दिवशी होणार घोषित
याबरोबरच बीसीसीआयने आयपीएलच्या येत्या हंगामातील २ नव्या संघांची नावे घोषित करण्याची दिनांकही जाहीर केली आहे. २५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच टी२० विश्वचषकाचा थरार सुरू असताना या नव्या संघांची नावे आयपीएलप्रेमींना कळतील. त्यानंतर लगेचच २०२३ ते २०२७ पर्यंतच्या आयपीएल मीडिया अधिकाऱ्यांसाठी बोर्ड टेंडरचीही घोषणा केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
पोलार्डचा ‘अष्टपैलू’ पराक्रम! गेल आणि केएल राहुलला एकाच षटकात बाद करत विश्वविक्रमाला घातली गवसणी
मुंबईकरांची मनंच मोठी! चेंडू पायाला लागल्याने राहुल झाला असता धावबाद, पण कृणालने स्वत: पंचांना अडवलं
जडेजा, इरफाननंतर फक्त अष्टपैलू कृणाललाच जमलाय आयपीएलमधील ‘हा’ पराक्रम, वाचा सविस्तर