एकापेक्षा एक धुरंधर जागतिक दर्जेचे वेगवान गोलंदाज देणाऱ्या पाकिस्तान क्रिकेटचा संघ गेल्या दशकात मजबूत होता. आपल्या गोलंदाजीच्या जीवावर विरोधी संघातल्या फलंदाजांची भांबेरी उडून देण्यात पटाईत होते. मात्र आजचा संघ तितका स्ट्रॉंग नाही. कालांतराने याच पाकिस्तानच्या संघाला असा एक कर्णधार मिळाला ज्याच्या नेतृत्वाखाली संघ जागतिक क्रिकेटमध्ये पुन्हा आपला दबदबा निर्माण करू लागला.
सरफराज अहमद असे या यष्टिरक्षक फलंदाजाचे नाव आहे. ज्याचा जन्म सिंध प्रांताची राजधानी कराची 22 मे रोजी 1987 साली पाकिस्तान येथे झाला. फलंदाजी आणि यष्टिरक्षक तरबेज असलेल्या सर्फराजने २००६ साली आयसीसीचा १९ वर्षांखालील विश्वचषकाचा किताब पाकिस्तानला मिळवून दिला होता.
सर्फराज अहमदच्या या कर्तबगारी नंतर त्याला राष्ट्रीय संघात कामरान अकमल यांचा बॅकअप खेळाडू म्हणून संघ स्थान देण्यात आले. त्यानंतर हळूहळू सर्फराजने आपले संघातले स्थान पक्के केले. अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या खेळाडूंच्या खांद्यावर राष्ट्रीय संघाची धुरा सोपवली.
2017 साली झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा संघ अहमदच्या नेतृत्वाखाली खेळण्यास उतरला. स्पर्धेत हा पाकिस्तान संघ अतिशय कमजोर मानला जात होता. अहमदने अपेक्षा पेक्षा चांगली कामगिरी करत पाकिस्तानला पहिल्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली.
पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराचे मूळ नाते भारताशी देखील आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसेलही. सरफराज अहमदचे आजोबा हाजी वकील अहमद हे भारत सोडून पाकिस्तानातल्या कराची शहरामध्ये जाऊन राहिले. ते मूळचे युपीमधल्या फतेपूर जिल्ह्याचे मुळचे रहिवासी होते. भारतात असताना त्यांच्या आजोबांनी ग्रामपंचायतीची निवडणूकही जिंकली होती. विशेष म्हणजे त्याचे मामा मेहबूब हसन हे देखील यूपीच्या प्रतापगड जिल्ह्यामधील कुंडागाव रहिवासी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सत्तरच्या दशकात ‘या’ भारतीय फिरकीपटूची होती भलतीच दहशत, आजही विक्रम आहेत अबाधित
आरसीबीची प्लेऑफमध्ये थाटात एंट्री; आयपीएल इतिहासात आठव्यांदा केली ‘अशी’ कामगिरी
रोहित शर्मासारखा दिग्गज आयपीएल २०२२मध्ये ठरला अपयशी, नाही करता आली ‘ही’ सोपी कामगिरी