---Advertisement---

शाकिबच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, विजयासाठी बांगलादेशला दिले 187 धावांचे लक्ष्य

On: रविवार, डिसेंबर 4, 2022 2:39 PM
Shakib Al Hasan
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND)यांच्यात पहिला वनडे सामना रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याचा हा निर्णय अतिशय योग्य ठरल्याचे दिसले, कारण भारताने पहिल्या चार विकेट 100च्या आतच गमावल्या. केएल राहुल याने 73 धावा केल्याने भारताने 41.2 षटकात सर्वबाद 186 धावसंख्या उभारली.

यावेळी बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन यांची गोलंदाजी प्रभावशाली ठरली. त्याने भारताच्या डावाच्या 11व्या षटकात कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्या विकेट घेतल्या. यामुळे संघ अडचणीत आला. रोहित 27 आणि विराट 9 धावा करत बाद झाले. त्याआधी भारताने पहिली विकेट शिखर धवन याची गमावली होती. तो 5.2 षटकात मेहदी हसन मिराज याचा बळी ठरला. हसनने धवनला 7 धावांवर असताना त्रिफळाचीत केले.

श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. रोहित, विराट बाद झाल्यानंतर अय्यरकडून खूप अपेक्षा होत्या.त्याने केएल राहुल याच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. अय्यरने न्यूझीलंड दौऱ्यात तुफानी फलंदाजी केली होती, मात्र बांगलादेशविरुद्ध त्याला सातत्य राखता आले नाही. भारताचा संघ कसाबसा 100 पर्यंत पोहोचत असताना, अय्यर एबादत होसनचा शिकार ठरला. त्याने 39 चेंडूत दोन चौकार मारताना 24 धावा केल्या.

अय्यर गेल्याने भारताची स्थिती 20 षटकात 4 विकेट्स गमावत 92 धावा अशी झाली. राहुलचा फलंदाजी क्रमांक बदलला असला तरी त्याने उत्तम कामगिरी केली. त्याने वॉशिंग्टन सुंदर याच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 75 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली, जी या सामन्यात भारतासाठी महत्वाची ठरली. वॉशिंग्टनने 43 चेंडूत 19 धावा केल्या. दुसरीकडे राहुलने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील 11वे अर्धशतक ठरले.

https://twitter.com/ICC/status/1599316751321559040?s=20&t=piODojToeswqlNcTTSod0g

बाद होण्याआधी राहुलने 70 चेंडूत 73 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याला इबादोत हुसेन याने अनामूल हक करवी झेलबाद केले. बांगलादेशकडून सर्वोत्तम कामगिरी शाकिबने केली. तो मार्चनंतर वनडे खेळत होता. त्याने या सामन्यात 10 षटकात 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने दोन षटके निर्धाव टाकली. त्याने विराट, रोहितनंतर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकुर यांना बाद केले.

शाकिबला बाकी गोलंदाजांनीही योग्य साथ दिली. बांगलादेशच्या एकाही गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट 6च्या पुढे गेला नाही. हुसेननेही 8.2 षटकात 47 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. भारताने कमी धावांचे लक्ष दिल्याने भारतीय गोलंदाजांवरचा दबाव वाढला आहे. वनडे मालिकेतील उर्वरित दोन सामने 7 आणि 10 डिसेंबरला खेळले जाणार आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताची चौकडी तंबूत, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेतच भारत करतोय संघर्ष
मोहम्मद शमीपाठोपाठ रिषभ पंतही वनडे मालिकेतून बाहेर, खुद्द बीसीसीआयने सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---