अनेकदा क्रिकेट सामना निरनिराळ्या कारणांनी काही काळ थांबवावा लागतो. एखादा प्राणी मैदानात आल्याने किंवा प्रेक्षक मैदानात घुसल्याने सामना अचानकपणे काही काळासाठी थांबतो. मात्र, काल (१४ मार्च) वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेला तिसरा वनडे सामना चक्क मधमाश्या मैदानात घुसल्याने काही वेळ थांबवावा लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
अशी घडली घटना
श्रीलंका संघाच्या डावाच्या ३८ व्या षटकात ही घटना घडली. त्यावेळी श्रीलंकेसाठी वनिंदू हसरंगा व अशेन बंदरा हे फलंदाजी करत होते. तर, वेस्ट इंडीजसाठी गोलंदाजी अँडरसन फिलीप करत होता. मात्र, त्याचवेळी अचानकपणे मधमाशांनी मैदानात प्रवेश केला. मधमाशांचा मोठा समूह असल्याने मैदानावरील सर्व खेळाडू व पंच आपल्या जागी झोपले. काही काळानंतर सर्व मधमाशा मैदानाबाहेर गेल्याने खेळाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडीजने मालिका घातली खिशात
एन्टिगा येथील सर विवीयन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमान वेस्ट इंडीजने श्रीलंकेवर पाच गड्यांनी मात करत श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना वनिंदू हसरंगा (नाबाद ८०) व अशेन बंदरा (नाबाद ५५) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित ५० षटकात २७४ धावा काढल्या. वेस्ट इंडीजसाठी अकील हुसेनने ३३ धावांत ३ बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, वेस्ट इंडीजसाठी डॅरेन ब्राव्होने १०२ धावांची शतकी खेळी केली. यष्टीरक्षक सलामीवीर शाई होपनेही ६४ धावा काढल्या. कर्णधार कायरन पोलार्डने आक्रमक ५३ धावा काढून संघाला पाच गड्यांनी विजय मिळवून दिला. ब्राव्होला सामनावीर तर, मालिकेत एक शतक व एक अर्धशतक ठोकणाऱ्या शाई होपला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
वेस्ट इंडीजने यापूर्वी झालेल्या टी२० मालिकेत २-१ ने सरशी साधली. उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका २१ मार्चपासून सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या:
ओए बॅट दिखा, बॅट! अर्धशतक झळकावलं अन् इशानला पत्त्याच नाही, मग विराटनं केलं असं काही
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराह चढला बोहल्यावर, लग्नातील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
अफगानी स्पिनर राशिद खानने रचला इतिहास, ठरला २१ व्या शतकातील विश्वविक्रमी गोलंदाज