शेख जायेद स्टेडियम, अबू धाबी येथे रविवारी (१४ मार्च) अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात दुसरा आणि अंतिम कसोटी सामना झाला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबत अफगाणिस्तान संघाने ही मालिका १-१ ने बरोबरीत आणली. दरम्यान अफगाणिस्तान संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज राशिद खान याने शतकातील एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिदने या सामन्यात संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने पहिल्या डावात ३६.३ षटकात ४ गडी बाद केले; तर दुसऱ्या डावात ६२.५ षटकात ७ गडी बाद केले. असे दोन्ही डावात मिळून त्याने तब्बल ११ गडी बाद केले. यासोबतच त्याने २१ व्या शतकात, एकाच कसोटी सामन्यात सर्वात जास्त षटक फेकण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला आहे. त्याने या सामन्यात तब्बल ९९.२ षटक गोलंदाजी केली आहे.
राशिद आधी २१ व्या शतकात बऱ्याच दिग्गजांनी एका कसोटीत ९० पेक्षा जास्त षटके टाकली आहेत. परंतु त्यांना ९९ षटकांचा आकडा गाठता आला नाही.
तसेच १९९८ मध्ये श्रीलंकन संघाचा फिरकी गोलंदाज मुथैया मुरलीधरन याने ओवलच्या मैदानावर इंग्लंड संघाविरुद्ध एकाच सामन्यात ११३.५ षटके गोलंदाजी करण्याचा विक्रम केला होता. त्यापूर्वी १९५७ मध्ये वेस्ट इंडीज संघाचा गोलंदाज सोनी रामाधीन याने एकाच सामन्यात विश्वविक्रमी १२९.० षटक गोलंदाजी केली होती. हा विश्वविक्रम अजुनपर्यंत मोडला गेला नाहीये.
https://twitter.com/cricketcomau/status/1371366303722737666?s=20
कसोटी मालिका बरोबरीत
या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वे संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर अफगाणिस्तान संघाने चोख प्रत्युत्तर देत झिम्बाब्वे संघाला ६ गडी राखून पराजित केले आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा खेळाडू हशमतुल्लाह शहिदी याने पहिल्या डावात केलेल्या द्विशतकी खेळी केल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यासोबतच ही मालिका १-१ ने बरोबरीत सुटली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भिडू तू बिनधास्त भीड’; सामन्यापूर्वी इशान किशनला रोहितने दिला होता मोलाचा सल्ला
हाच तो रस्ता..! बाद झाल्यानंतर कोहलीने ‘असा’ दाखवला स्टोक्सला पव्हेलियनचा मार्ग; पाहा व्हिडिओ
मी आधीच सांगितलं होतं, टीम इंडियापेक्षा MI भारी आहे; इंग्लिश दिग्गजाने पुन्हा काढली खोड






