कर्णधार म्हणून पॅट कमिन्सने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकला आहे. एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे आणि ऍशेस मालिकेव्यतिरिक्त, त्याने सर्व द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. मात्र, भारताविरुद्धची कसोटी मालिका अर्थात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकू शकलो नसल्याची खंत त्याला अजूनही आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे ही मोठी गोष्ट आहे. पॅट कमिन्सला हे साध्य करायचे आहे. आगामी पाच सामन्यांची कसोटी मालिकेपूर्वी पॅट कमिन्सने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पॅट कमिन्सला अद्याप भारताविरुद्ध कसोटी मालिका विजय अनुभवता आलेला नाही. मग तो घरच्या मैदानावर असो किंवा बाहेर. ऑस्ट्रेलियाने गेल्या 10 वर्षांपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत हा एक विक्रम आहे. जो पॅट कमिन्सला यावर्षी घरच्या भूमीवर तोडायचा आहे. टीम इंडियाला पराभूत करणे हेच अंतिम ध्येय असल्याचे त्याने सांगितले आहे.
पॅट कमिन्स म्हणाला, “आम्ही भारताविरुद्ध (ऑस्ट्रेलियामध्ये) दोन मालिका गमावल्या आहेत. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला वाटते की आमचा संघ खरोखरच चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे आम्ही हरण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही ज्यांच्याविरुद्ध खेळतो त्याच्याविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करतो. पण भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी आम्हाला सातत्याने कमगिरी करावी लागणार आहे.”
तसेच ऑस्ट्रेलियन संघावर दबाव असेल हे पॅट कमिन्सने मान्य केले आहे. तो म्हणाला, “मला वाटतं, जेव्हा जेव्हा एखादा संघ दडपणाखाली असतो, तेव्हा तुम्ही त्यांच्याविरुद्ध खेळत असाल तर ती वाईट गोष्ट नाही, पण त्यांनी याआधीही येथे खेळून चांगली कामगिरी केली आहे. आमचे काम त्यांना मदत करणे आहे, आम्हाला शांत राहावे लागेल, पाहूया. आम्ही काय करतो.” भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, जी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल आणि शेवटचा सामना जानेवारी 2025 मध्ये खेळवला जाईल.
हेही वाचा-
मुंबई कसोटीपूर्वी या नवख्या खेळाडूला संघात स्थान! रोहितची खेळी की कोच गंभीरचा विश्वास?
INDW vs NZW; मिताली राजसाठी 23 वर्षे लागली, मंधानाने केवळ 11 वर्षात केले हा चमत्कार
चाहत्यांसाठी खुशखबर..! विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत!